टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ ची फेरी रंगतदार होत चालली आहे. यजमान अमेरिका संघ सेमिफायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर होणार आहे. आता सात संघांमध्ये सुपर ४ मध्ये पोहोचण्यासाठी जबरदस्त संघर्ष होणार आहे. वेस्ट इंडीजनं USA संघाचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळं अमेरिका संघाचा पुढचा प्रवास जवळपास संपला आहे. सुपर ८ मधील दोन सामन्यांमध्ये हा संघ पराभूत झालाय. तिसरा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना इंग्लंडसाठीही महत्वाचा आहे.
यूएसए संघानं तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला ८० धावांनी पराभूत केलं आणि दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजला ६७ धावांनी नमवलं तर, यूएसए संघाला सेमिफायनलमध्ये पोहोचण्याची नामी संधी आहे. पण हा जर-तरचा प्रश्न आहे.
वेस्ट इंडीजनं USA ला पराभूत करून स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे. आता नेट रनरेटही सुधारला आहे. याआधीच्या सामन्यात वेस्ट इंडीजला इंग्लंडकडून हार पत्करावी लागली होती.
वेस्ट इंडीजच्या संघानं यूएसएला (WI vs USA) १२८ धावांत गुंडाळलं होतं. त्यानंतर १२९ धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ कमी षटकांतच विजय मिळवायच्या इराद्यानं उतरला होता. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी तुफानी खेळी करत अवघ्या १०.५ षटकांतच १ गडी गमावून हे लक्ष्य पार केलं.
त्यामुळे सेमिफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम राहिल्या. तर अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडीजला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं सेमिफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे.
वेस्ट इंडीज पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
वेस्ट इंडीज संघानं या विजयासह सुपर ८ गट २ मधील पॉइंट्स टेबलमध्ये दोन गुणांसह उत्तम नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी यूएसए संघ आहे. हा संघ जवळपास बाहेर झाल्याचं दिसतं. शाय होप यानं या सामन्यात ३९ चेंडूंत ८२ धावा चोपल्या. निकोलस पूरन यानं अवघ्या १२ चेंडूंत २७ धावा कुटल्या. यूएसएचा अखेरचा सामना २३ जूनला इंग्लंडसोबत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.