आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील ३ सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला. सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला आहे. एक संघ म्हणून भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय. मात्र काही चुका देखील होत आहेत, जे भारतीय संघाला महागात पडू शकतात.
रोहित शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून सलामीला फलंदाजी करतोय. त्याला सलामीला फलंदाजी करण्याचा चांगलाच अनुभव आहे. तर विराट कोहली केवळ आयपीएल स्पर्धेत सलामीला येतो. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येत आहेत. मात्र दोघांनाही चांगली सुरुवात करुन देता आलेली नाही. विराट कोहलीने स्पर्धेतील ४ इनिंगमध्ये २९ धावा केल्या आहेत. तर रोहितला केवळ पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावता आलं होतं. त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे विराट- रोहित सलामीला येण्याचा प्लान पूर्णपणे फसल्याचे पाहायला मिळाले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. आयपीएलमध्येही त्याने शतकं झळकावली. याच कामगिरीची दखल घेत त्याला भारतीय संघात संघात स्थान दिलं गेलं होतं. रोहित आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येण्याची चर्चा होती. मात्र गेल्या चारही सामन्यांमध्ये जयस्वालला बाकावर बसावं लागलं आहे. रोहित आणि यशस्वी जयस्वाल जर डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला, तर भारतीय संघाकडे डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाचं कॉम्बिनेशन असेल. यासह विराट कोहलीवरी दबाव येणार नाही.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला सातत्याने भारतीय संघात संधी दिली जात आहे. त्याला या स्पर्धेतील चारही सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्याला अवघ्या ७ धावा करता आल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. तर अमेरिका आणि आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. आता अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात तो ७ धावा करुन माघारी परतला आहे. दरम्यान गोलंदाजीतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.
शिवम दुबेला मोठे फटके खेळण्यासाठी प्लेइंग ११ मध्ये सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र तो या संधीचं सोनं करु शकलेला नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ३१ धावांची खेळी केली होती. ही खेळी वगळली, तर इतर कुठल्याही सामन्यात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला अवघ्या १० धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.