आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत गुरुवारी (२० जून) भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ करत ४७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी मिळून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी मिळून चौफेर फटकेबाजी केली. भारतीय संघाचा डाव डगमगत असताना दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. तर हार्दिक पंड्याने २४ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली.
हार्दिक पंड्या आपल्या पॉवर हिटींगसाठी ओळखल जातो. या डावात त्याच्या पॉवर हिटींगची झलक पाहायला मिळाली. त्याने २ चेंडू सीमारेषेपार पोहोचवले. भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना अफगाणिस्तानकडून १६ वे षटक टाकण्यासाठी नुर अहमद गोलंदाजीला आला होता. त्यावेळी हार्दिकने प्रेस बॉक्सच्या दिशेने गगनचुंबी षटकार खेचला. या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादव आपल्या पॉवर हिटींगसाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने चौफेर फटकेबाजी केली. १५ व्या षटकात सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून क्लासिक शॉट पाहायला मिळाला. त्याने देखील बाणाप्रमाणे सरळ शॉट मारला. या दोन्ही क्लासिक शॉटचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.