मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर खेळताना त्याने खडूस मुंबईकरसारखी खेळी केली आणि हैदराबादला या सामन्यात कमबॅक करुच दिलं नाही. त्याने टी नटराजनच्या चेंडूवर षटकार खेचत आपलं शतक साजरं केलं आणि मुंबईला ७ गडी राखून विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत.
हैदराबादविरुद्ध झळकावलेलं हे शतक सूर्याचं मुंबई इंडियन्स संघासाठी झळकावलेलं दुसरं शतक ठरलं आहे. यासह त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावण्याच्या बाबतीत त्याने सनथ जयसूर्या, सचिन तेंडुलकर, लेंडल सिमन्स आणि कॅमरुन ग्रीनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या फलंदाजांच्या नावे मुंबई इंडियन्स संघासाठी प्रत्येकी १-१ शतक झळकावण्याची नोंद आहे.
ऋतुराज गायकवाड अन् केएल राहुलच्या रेकॉर्डची बरोबरी..
टी-२० क्रिकेटमध्ये ६ शतकं झळकावणारा सूर्यकुमार यादव हा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने केएल राहुल आणि ऋतुराज गायकवाडच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या तिन्ही फलंदाजांच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ६-६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर विराट कोहलीच्या नावे ९ आणि रोहितच्या नावे ८ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
सूर्यकुमार यादव अन् तिलक वर्माच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद...
हैदराबादने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने मिळून १४३ धावांची भागीदारी केली. ही आयपीएल स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना चौथ्या विकेटसाठी केलेली दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी शिमरोन हेटमायर आणि गुरकीरत सिंग यांनीत २०१९ मध्ये १४४ धावांची भागीदारी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.