Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

Nanded News : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील अमराबाद रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. पाच किलोमीटर मार्गावर खड्डे व चिखलामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त असून तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
Nanded News
Nanded NewsSaam Tv
Published On
Summary
  • अमराबाद-अर्धापूर मार्गावरील सुमारे पाच किलोमीटर रस्ता पावसामुळे खड्डेमय

  • खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ व वाहनचालकांना अडचणी

  • पावसाळ्यात रस्त्यावर अपघाताचा धोका

  • साम टीव्हीचा छोटा रिपोर्टर साक्षी पवारने केली पोलखोल

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अमराबाद रस्त्याची पावसामुळे अक्षरशः दैना झाली आहे. सुमारे पाच किलोमीटरच्या या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी आणि चिखलामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साम टीव्हीच्या झेनजी रिपोर्टरने याची पोल खोल केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अमराबाद येथे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमधून आणि चिखलातून वाट काढताना वाहनचालकांची कसरत होत असून, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

Nanded News
Mosquito Bites : डास शोधून शोधून तुम्हालाच का चावतात? समोर आले धक्कादायक कारण

विशेष म्हणजे, हा रस्ता भाजपच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघात येतो. अमराबाद रस्त्याची दुरुस्ती करून नवीन रस्ता तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

दरम्यान, अमराबाद येथील विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेत या खराब रस्त्याची पोलखोल केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय, याचा आढावा घेतला साम टीव्हीची झेनजी रिपोर्टर विद्यार्थिनी साक्षी पवार हिने घेतला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न बनलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवास सुकर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Nanded News
Back Pain : रात्री अंथरुणावर झोपल्यावर पाठदुखी होते? 'या' आजरांची असू शकतात गंभीर लक्षणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com