

पुण्यातील कर्वेनगर भागात चारचाकी वाहनाला आग
अचानक वाहनाला आग लागल्याने परिसरात वाहतूक कोंडी
स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
आगीमध्ये चार चाकी पूर्णपणे जळून खाक
सुदैवाने जीवित हानी टळली
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
अग्निशामन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
आंबोली बंगलेवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाचा पाठलाग करून जखमी केले. मात्र वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे या पिल्लाला जीवदान मिळाले आहे. वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाची यशस्वी सुटका केली.वनविभागाची जलद कारवाई आणि ग्रामस्थांच्या मिळालेल्या सहकार्यामुळे एका वन्यजीवाचा प्राण वाचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली परिसरात रस्त्यावर वाघ दिसताच पर्यटकांनी चक्क वाहनामधून खाली उतरून फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली. वाघापासून सुरक्षित अंतर राखण्याऐवजी पर्यटकांनी केलेल्या या बेजबाबदारपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वन्यजीवप्रेमींनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, वन्यप्राण्यांच्या जवळ जाणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पुणे स्टेशन येथील संत ज्ञानेश्वर विद्यार्थ्यांचे वसतिगृहाच्या जुन्या इमारतीची पुनर्बांधणी करून वसतिगृह चालू करा.
MahaITचे कंत्राट रद्द करून स्वाधार व महाडीबीटीचा वेबसाईट अद्यावत करण्याची मागणी
सर्व विद्यार्थी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या भेटीला
संजय शिरसाठ यांच्या राजीनामेची मागणी शिंदे शिरसाट यांच्यासमोरच
साईबाबा आणि साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या विरोधात यूट्यूबसह समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणाऱ्या बदनामीकारक तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या व्हिडीओंच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.. संस्थानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती डॉक्टर स्वराणा कांता शर्मा यांच्या खंडपीठाने ग्रीव्हन्स अपिलेट कमिटी (GAC) ला पुढील सात दिवसांत या प्रकरणी कारणासहित निर्णय घेऊन 19 ऑगस्ट 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.. या निर्देशांमुळे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर समाजमाध्यमांवरून हटवण्याच्या संस्थानच्या मागणीवर सक्षम प्राधिकरणाकडून तातडीने निर्णय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..
पुण्यातील पक्ष कार्यालयात राज ठाकरे घेणार बैठक
राज ठाकरेंच्या उपस्थितीत शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन
अंबाबाई मंदिर संवर्धनाबाबत बोलावण्यात आलेली बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक रद्द केल्याने हिंदुत्ववादी संघटना आणि अंबाबाई भक्त आक्रमक झाले. संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आंदोलकांना आपल्या दालनात चर्चेसाठी बोलावून घेतले. मात्र, यावेळी चर्चा सुरू असतानाच अंबाबाई भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यां मध्ये शाब्दिक चकमक झाली. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी आपली भूमिका मांडताना आवाज चढवल्याने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी, "माझ्यासमोर आवाज चढवून बोलायचा नाही," असा सज्जड दम दिला. त्यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. दरम्यान, आंदोलकांनी अंबाबाई मंदिर संवर्धनासंदर्भातील आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यां समोर सविस्तरपणे मांडल्या. अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठकीची पुढील तारीख निश्चित केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, आगामी बैठकीत आपल्या सर्व प्रश्नांची ठोस उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी मागणी अंबाबाई भक्तांनी केली. तसेच, देवस्थान समितीतील अधिकारी आंदोलकांशी योग्य पद्धतीने संवाद साधत नसल्याची तक्रारही सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
पालघर तालुक्यातील माकणे येथे शेतजमिनीच्या रस्त्यावरून दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रोहिदास पाटील हे कुटुंबीयांसह शेतात काम करत असताना तरे कुटुंबीयांनी मारहाण केल्याची तक्रार सफाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, महिला आणि मुलींनाही मारहाण झाल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जैवविविधतेने नटलेल्या आंबोलीतील चौकुळ परिसरात कोल्ह्यांचा कळप मुक्तपणे बागडताना पाहायला मिळाला. भरपावसात रस्त्याच्या कडेला हे लाजरे-बुजरे प्राणी एकमेकांसोबत खेळण्यात दंग झाले होते. कोल्ह्यांचा हा मनमोहक खेळ पाहून या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना निसर्गाचा अनोखा अनुभव मिळाला. निसर्ग अभ्यासक काका भिसे यांनी कोल्ह्यांच्या या दुर्मीळ आणि सुंदर क्षणाचे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केले. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान, सन्मान आणि देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी अमरावती मनपातर्फे ‘हर घर तिरंगा २०२६’ अंतर्गत भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू मैदान येथून यात्रेला सुरुवात होऊन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप होणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संदेश या यात्रेतून दिला जाणार आहे. यात्रेत भाजपचे नेते, पदाधिकारी, मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधान परिषद सदस्य कृपाल तुमाणे, शिवसेना उपनेत्या मनिषा कायंदे यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न, पक्ष संघटनेची सद्यस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत उदय सामंत यांनी चंद्रपुरात शिवसेनेची ताकद आणि पक्षाचा प्रभाव वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सोलापूर-
तृतीयपंथीयांचे अनोखे आंदोलन, महावितरणने स्मार्ट मीटर काढताच गोंधळ शांत
तृतीयपंथीयांनी महावितरण कार्यालया समोर ठिय्या करत नोंदवला निषेध
कुठलीही पूर्वसूचना न देता जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्याच्या कारणावरून जुन्या विडी घरकुल परिसरातील तृतीयपंथीयांनी केलं आंदोलन
अचानक स्मार्ट मीटर बसविल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तृतीयपंथीयांनी महावितरणच्या कारभारा विरोधात जोरदार रोष व्यक्त केला.
सोलापूर ब्रेकिंग -
- सोलापुरातील वीरशैव गवळी समाजाची महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न
- गवळी समाजातील हजारो स्त्रियांनी डोक्यावर कलश घेत यात्रेत सहभाग नोंदवला
- यावेळी महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकातून भाविक यात्रेत सहभागी झाले
- यावेळी थरारक असा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम देखील पार पडला
- आषाढ महिन्याच्या अखेरीस दरवर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला जातो
सोलापूर -
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हापरिषद शाळेचा छत कोसळला होता.
त्याचं निवेदन देण्यासाठी आलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते झाले आक्रमक.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी त्यांना जाऊ दिले नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते झाले आक्रमक.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जात असताना.
त्यांची अडवणूक केल्या नंतर वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते झाले आक्रमक.
घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला
आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला
चिरागनगर परिसरात चाळीवर मध्यरात्री दरड कोसळल
पुणे
पुणे मुंबई महामार्गावर अपघात
पुण्यातील बाणेर परिसरात हायवे वरती कंटेनर झाला पलटी
टेम्पो आणि कंटेनर ची आज सकाळी बाणेर परिसरात जोरदार धडक
अपघातामुळे कंटेनर रस्त्यावरच झाला पलटी
अपघातात कंटेनर आणि ट्रक चालक किरकोळ जखमी
प्रशासनाकडून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू
कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
राज्यात होणाऱ्या शिक्षक भरतीत पेसा जिल्ह्यांमध्ये ओबीसींना शून्य टक्के आरक्षण दिलं गेल्याने आक्रमक झालेल्या ओबीसी हक्क परिषदेकडून आज पालघर येथे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली.
मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
‘माझे वैयक्तिक संबंध आहेत, पण सार्वजनिक कामात त्यांचा उपयोग होत नाही’अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची वाढती जवळीकवरून बोलताना,जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कामकाज सुरू होताच दोन्ही सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. त्यातच मल्लिकार्जून खर्गेंनी राज्यसभेत अमित शहांना बोलवण्याची मागणी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काल सायंकाळी कराडमध्ये मुक्कामी होते. सकाळी पाटण दौऱ्यावर निघण्यापूर्वी कराडमध्ये वयाची शंभरी पार केलेल्या 4 वयोवृद्ध सख्ख्या भावंडांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि चांगलं आयुष्य जगावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थनाही केली...
डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजार समितीच्या कामकाजाला वेग देण्याचा निर्णय पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. एपीएमसी मार्केटची पाहणी करून व्यापारी, अधिकारी आणि बाजारातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरू सांगोला तालुक्यातील बलवडी येथे लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रसंगी सांगोल्यातील भाजप पदाधिकारी उल्हास धायगुडे सह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला पाचोराकडून जाणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एकूण 12 भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उर्वरित सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
- उद्या आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची करणार पाहणी
- खड्ड्यांच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घेणार आढावा
- तर १७ तारखेला संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
नांदेडच्या कंधार शहरातील ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट झाला असून रुग्णालय आणि परिसरात उंदरांची पिल्ले खेळताना आढळून आली आहेत. यामुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उंदरांच्या समस्या यापूर्वीही निर्माण झाले होते.
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी ८ गेट उघडले आहेत.
- नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू, एक जखमी
- नागपुरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
- कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट रोडवर हा अपघात घडला.
वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून बरसात असलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली असून हा जलसाठा आता 35 टक्क्यांवर पोहोचलाय...29 जुलैपर्यंत या धरायची पाणी पातळी अत्यंत धोकादायक होती
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक आज तीन तास वाहतुकीसाठी बंद असणार आहे. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मार्गावर दुरुस्तीचं काम आणि मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
या काळात एक्सप्रेस वेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या घाटातून वळवण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका 45 मिनिटांवरून 40 मिनिटे करण्यासह विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांच्या एका तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या निर्णयाला विरोध करत छात्रभारती संघटनेच्यावतीने संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले
पश्चिम सिंहगड भागातील थोपटेवाडी–मतेगेट दरम्यान बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दिवसा बिबट्याचा वावर असल्याने शाळकरी मुले, महिला तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईच्या घाटकोपरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय. यामघ्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे आज दीप अमावस्या अर्थात गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत.
कोल्हापुरातील चिकन, मटण आणि फिश मार्केटमध्ये सकाळपासूनच खवय्यांनी मोठी गर्दी केली आहे.
आंबा घाटात कोसळणाऱ्या दरडी, खचणाऱ्या रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आंबा घाटातून होणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई खैरेनगर रोडवरील ढगेवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा मृत्युमुखी पडला. अन्न पाण्याच्या शोधात कोल्हा रस्त्यालगत आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन रस्ता ओलांडत असताना कोल्ह्याला अज्ञात वाहनांची धडक लागली या अपघातात कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी वनविभागाची टिम दाखल झाली
वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ११०० मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा वितरणासाठी खुला करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज जव्हार विक्रमगड परिसरातील काही गावांमध्ये NDRFच्या पथकाकडून भूकंपाच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि बचावकार्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
गणेश उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम कडकपणे राबवा पर्यावरण संस्थांची पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी
गणेशोत्सवमध्ये मंडळाकडून मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजवण्यात येत आहेत त्याचा नागरिकांना त्रास होतो
डीजेमुळे ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे त्याचे नियम कडकपणे राबवून कारवाई करण्याची मागणी
पुण्यातील 14 पर्यावरण संस्थेकडून पुणे पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे
* कुंभमेळा कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
* नाशिक पोलिसांनी 4 जणांना घेतले ताब्यात
* आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३० ते ३२ हजार कोटींच्या होणाऱ्या कामांचा गैरफायदा घेऊन मोठी फसवणूक
डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी
चाकण,मंचर,नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर मार्गेच रेल्वे करण्याची डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर शहरातील सोलापूर-धुळे महामार्गाजवळील सुधाकरनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेख असनान शेख मोईन (वय अंदाजे १६ वर्षे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.रील्सच्या चटक आणि हलगर्जीपणामुळे निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
यवतमाळच्या अकोला बाजार परिसरातून घाटंजी तालुक्यातील घोटीकडे चारचाकीने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने उंदरणी शेतशिवारात अडविले.
वाहनाची झडती घेतल्यानंतर 76 हजारांची देशी दारू आढळून आली.पोलिसांनी वाहनासह दारू असा दोन लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.