T-20 World Cup, Team India: टीम इंडियाचं टी-20 WC सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म? इथून पुढे कसं असेल समीकरण? वाचा

Team India Semi Final Scenario: भारतीय संघाने सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. यासह सेमीफायनलचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे.
T-20 World Cup, Team India: टीम इंडियाचं टी-20 WC सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म? इथून पुढे कसं असेल समीकरण? वाचा
indian cricket teamtwitter

भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव केला आहे. हा सामना ४७ धावांनी जिंकून भारतीय संघाने सेमी फायनलचं तिकीट जवळजवळ कन्फर्म केलं आहे. इथून पुढे भारतीय संघाला आणखी २ सामने खेळायचे आहेत.

भारतीय संघाचं सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म?

अफगाणिस्तानला नमावल्यानंतर भारतीय संघ पुढील बांगलादेश संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना २२ जून रोजी होणार आहे. बांगलादेशविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यामुळे बांगलादेशला हरवणं भारतीय संघासाठी फार आव्हानात्मक नसेल. जर हा सामना जिंकला तर भारतीय संघाच्या नावे २ पैकी २ विजयाची नोंद होईल. यासह भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर भारतीय संघाचा पुढील सामना २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला तरीदेखील फारसा फरक पडणार नाही.

T-20 World Cup, Team India: टीम इंडियाचं टी-20 WC सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म? इथून पुढे कसं असेल समीकरण? वाचा
IND vs AFG: भारताची सुपर-8मध्ये विजय सलामी, सूर्या-बुमराहची तुफानी खेळी; अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा

सुपर ८ फेरीत ८ संघ २ गटात विभागले गेले आहेत. या ८ पैकी दोन्ही गटातून प्रत्येकी २-२ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत ४७ धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या नेट रन रेटने गगनभरारी घेतली आहे. त्यामुळे २ पैकी १ सामना गमवला तरीदेखील भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

T-20 World Cup, Team India: टीम इंडियाचं टी-20 WC सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म? इथून पुढे कसं असेल समीकरण? वाचा
IND vs AFG, Highlights: अफगाणिस्तानला तर हरवलं, मात्र या २ कारणांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने निर्णायक ५३ धावांची खेळी केली. तर धावांचा बचाव करताना बुमराहने ३ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com