Manasvi Choudhary
वाघाटी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध रानभाजीपैंकी एक भाजी आहे. पावसाळ्यातच या भाजीचे सेवन केले जातात. कोकणात विशेषत: ही भाजी सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध असते.
औषधी गुणधर्मासाठी वाघाटी भाजीचे सेवन केले जाते. ही भाजी पचायला हलकी असते यामुळे आषाढी एकादशीचा उपवास सोडताना या भाजीचे सेवन केले जाते.
वाघाटी अत्यंत पौष्टिक भाजी आहे. वाघाट्याची भाजी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता.
गावरान पद्धतीने वाघाटी भाजीची ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यास जेवणाची चव आणि सुगंध उत्तम येतो.
वाघाटीची भाजी बनवण्यासाठी सर्वातआधी वाघाटी भाजी चिरून किंवा ठेचून घ्या. त्यानंतर या भाजीचे बारीक तुकडे करा.
भाजीसाठी फोडणी देण्यासाठी तुम्ही या मिश्रणात जिरे, हिंग, हळद आणि कांदा चांगला परतून घ्या.
वाघाट्याची भाजी झणझणीत मसाल्यांसोबत बनवल्यास तिची चव आणखी खुलते. यासाठी या मिश्रणात हळद, धने- जीरे पावडर, लाल मसाला, गरम मसाला, पनीर किंवा पावभाजी मसाला मिक्स करा.
भाजीमध्ये थोडे पाणी मिक्स करून भाजी शिजवून घ्या. भाजीवर झाकण ठेवा.
भाजी शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. म्हणजे घरच्या घरी गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी ही रेसिपी तयार होईल.