Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Saam Tv

दिप अमावस्या कधी आहे?

आषाढ अमावस्येला दिप अमावस्या म्हणतात. यंदाची दिप अमावस्या बुधवारी १२ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

DEEP AMAVASYA | PINTREST

अन्नपूर्णा देवी

गव्हाच्या कणकेचे दिवे लावण्याची परंपरा आहे. गव्हाचे पीठ हे अन्नपूर्णा देवीचे स्वरूप मानले जाते. यामुळे घरात सुख,शांती आणि अन्नाची समृद्धी राहते.

DEEP AMAVASYA | GOOGLE

पितृत्व आणि सूक्ष्मजीव

यादिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. पितरांचे स्मरण करून सूक्ष्म जीवांना पीठ खाण्यासाठी ठेवले जाते.

DEEP AMAVASYA | GOOGLE

लहान मुलांना औक्षण

लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, दीर्घायूष्य मिळावे म्हणून कणकेच्या दिव्यांनी मुलांचे औक्षण केले जाते.

DEEP AMAVASYA | GOOGLE

कणकेचे दिवे कसे बनवतात ?

गव्हाच्या पीठात गुळ, तूप, वेलची पूड टाकून कणकेचा दिवा बनवला जातो. दिव्याचा आकार देऊन पीठ उकडवले जाते. त्यात साजूक तूप घालून दिवे प्रज्वलित केले जातात.

DEEP AMAVASYA | GOOGLE

प्रार्थना

दिवे प्रज्वलित करताना घरात सुख समृद्धी नांदो, उत्तम आरोग्य लाभो , पितरांचे आशीर्वाद कायम राहो, अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते.

DEEP AMAVASYA | GOOGLE

प्रसाद

शेवटी प्रसाद म्हणून हे दिवे खाण्यांची परंपरा आहे. तसेच घरातील सूक्ष्मजीवांपासून ते गाई- गुरांना, पक्षी- प्राण्यांना हा दिवा प्रसाद म्हणून खाण्यास दिला जातो.

DEEP AMAVASYA | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

DEEP AMAVASYA | GOOGLE

Monsoon Healthcare Tips : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या 5 भाज्या, नाहीतर व्हावं लागेल अॅडमिट

Monsoon Healthcare Tips | META AI
येथे क्लिक करा