Monsoon Healthcare Tips : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या 5 भाज्या, नाहीतर व्हावं लागेल अॅडमिट

Saam Tv

पालक आणि इतर पालेभाज्या

पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या लवकर सडतात. भाज्यांवर किडे पडतात. किडे सारख्याच रंगाचे असल्याने पटकन दिसत नाही. अशा भाज्या खाल्याने पोट बिघडणे, फूड पॉइझन यांसारखे आजार होतात.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

वांगी

वांग बाहेरून जरी चांगल दिसत असल तरी आतून खराब असू शकत. पावसाळ्यात याच प्रमाण अधिक वाढत. म्हणून भाजी तपासून घ्यावी.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

कोबी

कोबी ही मुळातच पाने एकत्र करून तयार होणारी भाजी आहे. त्यामुळे या पानांमध्ये छोटे किडे असण्याचे प्रमाण अधिक असते.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

फ्लॉवर

फ्लॉवर पानांनी घेरलेली असते. यात पडणारे किडे हे फुलासारखे पांढरे किंवा पानांच्या रंगाचे असतात. त्यामुळे ते पटकन दिसत नाहीत. अशा भाज्या खाणे धोकादायक असते.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

कंदमुळे

जमिनीत पाणी साचल्यामुळे कंदमुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंदमुळे खातना काळजी घेतली पाहिजे.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

मशरूम ( अळंबी )

मशरूम ओलावा आणि दुषित पाणी लवकर शोषुन घेतात. ज्यामुळे त्यावर बुरशी वाढते आणि विषवाधा होण्याचे प्रमाण अधिक असते.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

कोणत्या भाज्या खाव्या

दोडका, दुधी भोपळा, कारली, पडवळ, तोंडली,सुरण, रताळी, कडधान्ये आणि डाळी इ. भाज्या पावसाळ्यात खाण्यासाठी उत्तम आहेत.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Monsoon Healthcare Tips | PINTREST

Health Tips : धोक्याची घंटा! उशीजवळ फोन ठेवून झोपताय? तर वेळीच सावध व्हा

Health Care Tips | META AI
येथे क्लिक करा