Saam Tv
अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आता मोबाईल देखील गरजेची वस्तू झाली आहे. दिवसभर हातात आणि रात्रभर फोन आपल्या उशाजवळ असतो . कारण फोन बघितल्याशिवाय आपल्याला झोपच येत नाही.
अलार्मसाठी किंवा इतर कारणांसाठी फोन आपण शेजारी घेऊन झोपतो. पण तुम्हाला माहित आहे का हाच फोन तुमच्यासाठी किती धोकादायक आहे.
फोनमधून सतत निघणारे रेडिएशन्स मेंदूसाठी धोकादायक असतात. त्या रेडिएशनमुळे शांत मेंदू होत नाही त्यामुळे गाढ झोप लागत नाही.
मोबाईल स्क्रिनमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूला दिवस असल्याचा भास करत राहते. त्यामुळे झोपेसाठी आवश्यक असणारे मेलाटोनिन हार्मोन तयार होत नाही.
मोबाईल शेजारी ठेवून झोपल्याने कर्करोगाचा धोकाही वाढतो. असे एका संशोधनानुसार स्पष्ट झाले आहेत .
फोन सतत हातात असल्यामुळे नोटिफिकेशनची मेंदूला सवय होते. त्यामुळे रात्री देखील फोन जवळ असला तर मेंदू शांत राहत नाही.
रात्री फोन पाहिल्याने कॉर्टिसॉल हार्मोनमध्ये वाढ होते . यामुळे सकाळी उठल्यावर चिडचिड किंवा डोकेदुखी होते .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.