Beauty Tips : पायांच्या टाचांना भेगा पडल्यात? करा हे रामबाण उपाय, पाय होतील एकदम मऊ

Saam Tv

पायांना भेगा का पडतात?

शरीरातील पाण्याची कमतरता कमी झाल्यामुळे टाचा कोरड्या पडतात. त्यावर चालताना शरीराचा भार पडतो. त्यामुळे त्वचेतील लवचिकता कमी होते आणि पायाला भेगा पडतात.

Foot Care tips | PINTREST

तांदळाच्या पीठाचा स्क्रब

तांदळाचे जाडसर पीठ, मध आणि अॅपल साईड व्हिनेगर एकत्र करा. ही पेस्ट भेगांवर लावल्याने भेगा लवकर भरून निघतील.

Foot Care tips | PINTREST

मधाचा वापर

मध त्वचेला ओलावा देण्यास मदत करतो. कोमट पाण्यात मध मिसळून पाय भिजवल्यास त्वचेला ओलावा मिळतो आणि भेगा भरून निघतात.

Foot Care tips | PINTREST

केळ आणि अॅव्हकॅडो स्क्रब

पिकलेले केळे स्मॅश करून त्यात अॅव्हकॅडो टाका आणि हे मिश्रण एकत्र करून लावा. ही पेस्ट टाचांवर २० मिनिटे चोळा. यामुळे टाचा मऊ होतील.

Foot Care tips | PINTREST

नारळाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर नारळाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यावर कॉटनचे मोजे घाला.

Foot Care tips | PINTREST

पेट्रोलिअम जेली

टाच स्वच्छ धुवा. कोरड्या करा. रात्री झोपताना त्यावर पेट्रोलिअम जेली लावा.यामुळे पायाच्या त्वचेला ओलावा मिळेल आणि पाय मऊ, गुळगुळीत होतील.

Foot Care tips | PINTREST

कोरफडीचा गर

कोरफडीचा गर टाचांवर लावा. हा गर टाचांवर १५ ते २० मिनिटे ठेवावा. मग पाय स्वच्छ धुवून त्यावर मॉश्चराइझर लावा.

Foot Care tips | PINTREST

प्युमिस स्टोनचा वापर

पाय कोमट पाण्यात भिजवावे. भेगा पडलेल्या जागेवर प्युमिस स्टोनने हलक्या हाताने घासा. याने पायाला आराम मिळेल . थकवा दूर होईल.

Foot Care tips | Pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tips | Pintrest

Fresher Jobs : फ्रेशर्स आहात? जॉब शोधताय? असा Resume तयार केलात तर झटक्यात पास व्हाल Interview

Fresher Jobs | META AI
येथे क्लिक करा