Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Shiv sena supreme court hearing today 12th August live update: उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाला या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.
shiv sena supreme court hearing today live update
shiv sena supreme court hearing today live updateSaam TV Marathi

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update:थोड्याच वेळात होणार सुनावणीला सुरूवात

सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात शिवसेना कुणाची? यावर सुनावणीला सुरूवात होणार आहे. मागील १० दिवसातील ही चौथी सुनावणी आहे. त्यामुळे लवकर निर्णय लागण्याची शक्यता आहे.

shiv sena supreme court hearing today live update : सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) थोड्याच वेळात सुनावणी करणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी संविधानाच्या १० व्या अनुसूचीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता; अध्यक्षांच्या याच निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.

खंडपीठ (Bench): सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना.

यासोबतच, निवडणूक आयोगाने (ECI) एकनाथ शिंदे यांच्या गटालाच 'अधिकृत शिवसेना' म्हणून दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली दुसरी याचिका देखील आजच्या सुनावणीच्या यादीत सूचीबद्ध (Listed) करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com