suryakumar yadav with vvs laxman twitter/bcci
Sports

IND vs AUS 1st T20I: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० साठी टीम इंडिया सज्ज; ऋतुराज नव्हे तर हा फलंदाज करणार डावाची सुरुवात

India vs Australia T20 Series: या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. जाणून घ्या या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११.

Ankush Dhavre

Team India Playing 11,Ind vs Aus T20I Series:

वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता हे दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

तर ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११ जाणून घ्या. (India vs australia playing 11)

या फलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि इशान किशने हे सलामीला जाण्यासाठी पर्याय असणार आहेत. तर ऋतुराज गायकवाड या संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे तो डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

जर या तिन्ही फलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं तर, रिंकू सिंग किंवा तिलक वर्मापैकी एकाला प्लेइंग ११ मधून बाहेर राहावं लागेल. या सामन्यात इशान किशन आणि यशस्वी जयस्वालला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. (Team India playing 11)

तर ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तिलक वर्मा,शिवम दुबे आणि रिंकू सिंगपैकी दोघांना प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. असं झाल्यास रिंकू सिंगला बाकावर बसावं लागेल. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी रवी बिश्नोईच्या जागी दोघांना संधी दिली जाऊ शकते. तर मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

इशान किशन, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,शिवम दुबे/ रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/ रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT