भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की, कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला भारतीय टी-२० संघात पदार्पण करण्याची संधी मिळेल.
मात्र असं काही झालं नाही. या सामन्यात तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. दरम्यान संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या यशस्वी जयस्वालबद्दल प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे.
खरंच यशस्वी जयस्वाल पाणीपुरी विकायचा का?
भारतीय संघाचा युवा स्टार यशस्वी जयस्वाल याने जेव्हा आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्यावेळी त्याच्या काही स्टोरी व्हायरल झाल्या होत्या. त्यापैकी चर्चेत राहिलेली स्टोरी म्हणजे यशस्वी जयस्वाल पाणीपुरी विकायचा. मात्र या स्टोरीमध्ये किती सत्यता आहे? याचा खुलासा स्वत: प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी केला आहे.
यशस्वी जयस्वालचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी म्हटले की,'यशस्वी जयस्वाल आणि पाणीपुरी विकण्याचा काही एक संबंध नाही. ही स्टोरी पुर्णपणे खोटी आहे. या स्टोरीचा त्याच्या खऱ्या आयुष्याशी काही एक संबंध नाही. ही स्टोरी पाहुन मला खुप वाईट वाटतं कारण ही पुर्णपणे खोटी आहे.' यासह त्यांनी अशा खोट्या गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (Latest sports updates)
काय आहे यामागचं सत्य?
ज्वाला सिंग यांनी सांगितलं की, यशस्वी जयस्वाल पाणीपुरी विकणारा नव्हता. त्याने अनेकदा आझाद मैदानाजवळ पाणीपुरी विकणाऱ्यांची मदत केली आहे. वृत्तवाहीन्यांनी असा दावा केला होता की, त्याचे वडील देखील पाणीपुरी विकायचे.
तसेच यशस्वी जयस्वाल हा त्याच्या वडीलांना मदत करायचा. ही केवळ एक अफवा होती.' असं त्याचे बालपणीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.