smriti mandhana with shafali verma twiter/bcci women
क्रीडा

IND-W vs SA-W, Test Match: टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला दणका! पहिल्याच सत्रात स्म्रिती अन् शेफालीचं विक्रमी शतक

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना २९ जून रोजी बारबाडोसमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. चेन्नईत सुरु असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं आहे.

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा थरार चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे.

स्म्रिती मंधाना- शेफाली वर्माचं शतक

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेफाली वर्मा आणि स्म्रिती मंधानाची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली. दोघांनी संघानला चांगली सुरुवात करुन दिली. दोघींनी मिळून संघाला २९२ धावांची दमदार सुरुवात करुन दिली. ही महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यादरम्यान स्म्रिती मंधानाने १४९ धावांचं योगदान दिलं. तर शेफाली वर्माने १४१ धावांचं योगदान दिलं. स्म्रिती मंधाना १४९ धावांवर माघारी परतली. तर शेफाली वर्माने १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्याच सेशनमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: स्म्रिती मंधाना, शेफाली वर्मा, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), अ‍ॅनेक बॉश, मरिजेन कॅप, सून लूस, डेल्मी टकर, नादिन डी क्लर्क, सीनालो जाफ्टा (यष्टीरक्षक), अ‍ॅनरी डर्कसन, नॉन्कुलेको म्लाबा, मासाबाटा क्लास, तु्मी सेखुखुने

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT