Shafali Verma: छोटा पॅकेट बडा धमाका! १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या शफालीने मोडले 'हे' मोठे रेकॉर्ड..

Shafali verma: शफालीने १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Delhi Capitals beat Gujarat Giants by 10 wickets
Delhi Capitals beat Gujarat Giants by 10 wicketsSAAM TV
Published On

Shafali verma records: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत शफाली वर्माची तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पार पडला.

या सामन्यात शफालीने गुजरात जायंट्स संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गुजरातने दिलेल्या १०६ धावांचा पाठलाग करताना शफालीने १९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. (Latest sports updates)

Delhi Capitals beat Gujarat Giants by 10 wickets
IND VS AUS 4th test: हिटमॅन इज बॅक! जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; तेच करत हिटमॅनने रचला इतिहास

शफालीची २८ चेंडूंमध्ये ७६ धावांची खेळी..

हल्लाबोल करण्यासाठी मैदानात आलेल्या शफालीने येताच तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. तिने २८ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची तुफानी खेळी केली.

तर लेनिंगने १५ चेंडूंचा सामना करत २१ धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने अवघ्या ७.१ षटकात सामना संपवत विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद सामना संपवण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

Delhi Capitals beat Gujarat Giants by 10 wickets
WPL 2023: शेफाली वर्माचा झंझावात! 28 चेंडूत कुटल्या 76 धावा; Delhi Capitals ची Gujarat Giants वर 10 विकेटने मात

शफालीने मोडला निदा डारचा रेकॉर्ड

यासह शफाली वर्माने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. ती विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी दुसरीच फलंदाज ठरली आहे. यासह तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू निदा डारचा २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. मात्र हा एक आंतरराष्ट्रीय सामना होता. तर शफालीने हा विक्रम लीग क्रिकेट स्पर्धेत केला आहे.

टेस फ्लिंटॉफने १६ चेंडूंमध्ये झळकावले होते अर्धशतक..

तर लीग क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, विमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेत टेस फ्लिंटॉफने १६ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या. विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम गुजरातची फलंदाज सोफिया डंकले नावे आहे. तिने १८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com