IND vs ENG Semi Final : रोहित- सूर्याची दमदार सुरुवात; इंग्लिश गोलंदाजांचा भेदक मारा! टीम इंडियाचं इंग्लंडसमोर १७२ धावांचं आव्हान

India vs England T20 World Cup Semi Final 2024: टी २० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पावसाच्या व्यत्ययातही डाव सावरत मजबूत धावसंख्या उभारली आहे. इंग्लंडसमोर १७२ धावांच लक्ष्य ठेवलं आहे.
IND vs ENG Semi Final
IND vs ENG Semi Final Saam Digital

टी २० विश्वचषकात आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना पावसाच्या सावटाखाली गयाना येथे आज खेळला जात आहे. पावसाने खेळात दोनवेळा व्यत्यय आणला. तरी रोहीत शर्माची 57 धावांची दमदार खेळी आणि सूर्यकुमार यादवने दिलेली साथ यामुळे भारताने १७१ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आहे. सूर्यकुमारने 47 धावा केल्या. इंग्लंडसमोर १७२ धावांचं लक्ष्य ठेण्यात आलं आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदान उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताला पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने तिसऱ्या षटकात १९ धावांवर बसला. रीस टोपलीने कोहलीला क्लीन बोल्ड केलं. सध्या कर्णधार रोहित शर्माला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात उतरला होता. तर पंतला सॅम कुरनने बेअरस्टोच्या हाती झेलबाद केलं. खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने दोन गडी गमावून ६५ धावा केल्या होत्या.

टी २० विश्वचषकात रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात त्याने तडाखेबंद खेळी करत ९२ धावा केल्या होत्या. यावेळीही कर्णधारपदाला साजेशी खेळी करत त्याने संघाला सावरलं. त्याला सूर्यकुमार यादवने मोलाची साथ दिली. मात्र रोहित शर्मा ५७ धावांवर असताना बाद झाला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद झाला. अवघ्या ३ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं.

IND vs ENG Semi Final
IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध इंडियाच्या सामन्याआधी वरुणराजाची बॅटिंग, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?

भारताला 13व्या षटकात 113 धावांवर तिसरा धक्का बसला. आदिलने रोहित शर्माला तंबूत धाडलं. तो 57 धावा करून बाद झाला. चौथा धक्का 16व्या षटकात 124 धावांवर बसला. सूर्यकुमार यादवचं अर्धशतक हुकलं. सूर्यकुमार 36 चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. आर्चरने सूर्यकुमार यादवला ख्रिस जॉर्डनकडे झेलबाद केलं. त्यानंतर हार्दिक पांड्याने डाव सावरला होता. सलग दोन षटकार ठोकले मात्र मात्र तिसरा षटकार मारताना तो झेलबाद झाला. त्याने २३ धावांचं योगदान दिलं. जडेजाने १७ तर अक्षर पटेलने १० धावां केल्या.

IND vs ENG Semi Final
Micheal Vaughan: 'हा तर इतर संघांवर अन्याय..', टीम इंडियाचं नाव घेता मायकल वॉनचा ICC वर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com