IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध इंडियाच्या सामन्याआधी वरुणराजाची बॅटिंग, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?

India vs England T20 World Cup Semi Final 2024: टी२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी रात्री भारत आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडियाच्या सामन्याआधी वरुणराजाची बॅटिंग, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?
IND vs ENG Saam tv

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी रात्री भारत आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. दोन्ही संघामध्ये गुयानाच्या प्रोविडेन्स मैदानात सामना होणार आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर इंग्लंड संघाचं नेतृत्व जोस बटलर करत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. मात्र, या सामन्याआधी स्टेडियम परिसरात शहरात वरुणराजाने बॅटिंग सुरु केली आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या उपांत्य सामन्यावर पावसाचं संकट आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यातच या सामन्याआधी पाऊस सुरु असल्याची माहिती भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकनेही याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. 'सध्या या ठिकाणी चांगली स्थिती नाही. आम्ही स्टेडियमच्या दिशेने निघालो, त्यावेळी जोरदार पाऊस झाला. आता थेंब थेंब पाऊस सुरु आहे. ही चांगली बातमी नाही. या ठिकाणी ऊन पावसाचा खेळ सुरु आहे, असं दिनेश कार्तिकने म्हटलं.

गुयानामध्ये वातावरण कसं राहील?

मीडिया रिपोर्टनुसार, गुयानामध्ये भारतीय वेळेनुसार सांयकाळी ६.३० वाजता ४० टक्के पावसाची शक्यता आहे. तर भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता गुयानामध्ये ६६ टक्के पावसाची शक्यता आहे. तर भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची शक्यता कमी आहे. त्यानंतर पुढे भारतीय वेळेनुसार, रात्री ९.३० वाजता ४९ टक्के पावसाची शक्यता आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडियाच्या सामन्याआधी वरुणराजाची बॅटिंग, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?
IND vs ENG: जिथे सेमिफायनल होणार तिथे कसं आहे वातावरण? सामन्याच्या काही तासांपूर्वीचा VIDEO होतोय व्हायरल

पुढे रात्री १०.३० वाजता ३४ टक्के पावसाची शक्यता आहे. रात्री १२.३० वाजता ४० टक्के पावसाची शक्यता आहे. आयसीसीने सामन्यासाठी ४ तासांचा अधिक वेळ दिला आहे. सामन्याचा निकाल जाहीर करण्यासाठी दोन्ही संघाना १०-१० षटक खेळणे अनिवार्य आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास टीम इंडिया फायनलमध्ये जाईल. तर इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर जावे लागेल. सुपर-८ मध्ये आपल्या ग्रुपमध्ये टीम इंडिया टॉपवर होती. तर इंग्लंडचा संघ त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com