IND vs ENG, Weather Report: टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार? इंग्लंडचं टेन्शन वाढलं!

India vs England Semi Final, Weather Report: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमिफायनलचा सामना रंगणार आहे.
IND vs ENG, Weather Report: टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार? इंग्लंडचं टेन्शन वाढलं!
india vs englandtwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या सेमिफायनलमध्ये अटीतटीटी लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. साखळी फेरीतील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर सुपर ८ फेरीतही भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. शेवटी ऑस्ट्रेलिया हरवून भारतीय संघाने सेमिफायनलचं तिकीट मिळवलं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या जिवावर इंग्लंडला सेमिफायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

हा सामना २७ जून रोजी गयानामध्ये रंगणार आहे. या सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. दरम्यान पाऊस पडल्यास कसा लावला जाईल सामन्याचा निकाल? जाणून घ्या.

IND vs ENG, Weather Report: टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार? इंग्लंडचं टेन्शन वाढलं!
IND vs ENG, Semi Final: भारत की इंग्लंड? दक्षिण आफ्रिकेसोबत फायनलमध्ये कोण भिडणार? वाचा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

कसं असेल हवामान?

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानूसार, सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ६०% इतकी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये २०-२० षटकांचा सामना होण्याची शक्यता कमी झाली आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. सामना सुरु झाल्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता ही ३३% इतकी असणार आहे. तर दुपारी १ च्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ही ५९ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे पाऊस या सामन्यात अडथळा निर्माण करु शकतो.

IND vs ENG, Weather Report: टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार? इंग्लंडचं टेन्शन वाढलं!
IND vs ENG, Playing XI: सेमिफायनलमध्ये टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार? रोहित या स्टार खेळाडूला संधी देणार?

या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. मात्र या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यास सामना सुरु होऊ शकतो. मात्र पावसामुळे सामना पूर्ण होऊच शकला नाही,तर भारतीय संघाची चांदी आणि इंग्लंडचं टेन्शन वाढणार आहे. सुपर ८ मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. त्यामुळे हा सामना रद्द झाला, तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com