IND vs SA, Final: सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! खराब मॅनेजमेंटचा फटका भारतीय संघालाही बसणार?

India vs South Africa, T20 World Cup Final : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.
IND vs SA, Final: सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! खराब मॅनेजमेंटचा फटका भारतीय संघालाही बसणार?
indian cricket teamtwitter
Published On

भारतीय संघाने सेमिफायनलच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करत टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठली आहे. तर भारतीय संघाने तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी भारतीय संघाने २००७ मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा एकदा फायनल गाठली, मात्र फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

भारतीय संघाचा फायनलचा सामना शनिवारी होणार आहे. म्हणजेच भारतीय संघ गेल्या ९ दिवसात पाचवा सामना खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना थकवा येऊ शकतो. त्यामुळे सपोर्ट स्टाफवर खेळाडूंना फिट ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.

इंग्लंडला हरवल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतीय संघ बारबाडोससाठी रवाना झाला. गयानामध्ये सेमिफायनलचा सामना झाला. तर बारबाडोसमध्ये फायनलचा सामना होणार आहे. दरम्यान भारतीय खेळाडू एयरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसून येत होता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बारबाडोसमध्ये दाखल झाले असून खेळाडूंनी फायनलसाठी सराव देखील सुरु केला आहे.

IND vs SA, Final: सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! खराब मॅनेजमेंटचा फटका भारतीय संघालाही बसणार?
IND vs SA, Final: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यावर पावसाचं सावट! फायनल रद्द झाल्यास कोण होणार चॅम्पियन?

दक्षिण आफ्रिकेचा सेमिफायनलचा सामना २७ जून रोजी पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ बारबाडोसला रवाना झाला. अफगाणिस्तानला प्रवासाचा फटका बसला. ४ तास फ्लाईट लेट आणि खेळाडूंना केवळ १ तासाची झोप भेटल्याचा परिणाम, खेळाडूंच्या कामगिरीवर दिसून आला. आता भारतीय खेळाडूंवर स्वत:ला फिट ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

IND vs SA, Final: सामन्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! खराब मॅनेजमेंटचा फटका भारतीय संघालाही बसणार?
IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिकेत रंगणार वनडे, टी -२० अन् कसोटी मालिकेचा थरार! BCCI कडून वेळापत्रक जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com