IND VS SA twitter
Sports

IND vs SA : प्रिन्स आता तरी चमकणार? दक्षिण आफ्रिकेविरोधात ११ शिलेदार कोणते?

IND vs SA 2nd T20I predicted playing eleven : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसऱ्या टी२० सामन्यात शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष आहे. भारत मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

Namdeo Kumbhar

IND vs SA 2nd T20I Live Streaming: चंदीगडमध्ये होणार्‍या दुसऱ्या टी२० सामन्यात उपकर्णधार शुभमन गिल अन् कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. गिल मागील १५ डावात एकही अर्धशतक ठोकू शकलेला नाही. त्यामुळे गिल याला आपल्या कामगिरीत सुधारणा करावीच लागणार आहे. नेटकऱ्यांकडून संजू सॅमसन याला प्लेईंग ११ मधून बाहेर बसवल्यामुळे राग व्यक्त करण्यात येतोय. पण त्याचवेळी गिल फ्लॉप ठरतोय, त्यामुळे बीसीसीआय अन् गंभीर यांची डोकेदुखी वाढली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेईंग ११ कशी असेल, कोणाला संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहेत.

कटक येथे झालेल्या पहिल्या T20I सामन्यात भारताने आफ्रिकेला फक्त 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आज होणाऱ्या दुसऱ्या टी२० कडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. चंदीगडच्या मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल, तर आफ्रिका कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघाची प्लेईंग ११ संतुलित असल्याचे दिसतेय. अभिषेक शर्माची आक्रमक सुरुवात आणि गोलंदाजीचा भेदक मारा. त्याशिवाय हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळी, यामुळे भारतीय संघाचे पारडे जड मानले जातेय. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने दक्षिण आफ्रिकेवर दबाव आणला. जसप्रीत बुमराहचा वेग आणि अर्शदीप सिंगचा स्विंग याचाही परिणाम पहिल्या सामन्यात दिसला.

पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. दिग्गज फलंदाज फेल ठरले. दुसरीकडे गोलंदाजीही कमकुवत जाणवली. मार्कराम, मिलर आणि ब्रेव्हिससारखे खेळाडू दुसऱ्या सामन्यात बाजी पलटवण्याचा प्रयत्न करतील. आज होणार्‍या सामन्यात आफ्रिकेच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच दिसतेय.

टी२० मध्ये हेड टू हेड सामने ३२

भारताचा विजय - १९

दक्षिण आफ्रिकेचा विजय - १२

निकाल नाही - १

लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहू शकतो?

गुरुवारी दुसरा टी२० सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता नाणेफेक होईल. तर ७:०० वाजता सामन्याला सुरूवात होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना पाहता येईल. तर जिओसिनेमा/हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटही सामना पाहता येईल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग ११ कशी असेल?

भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह , वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, डोनोव्हन फेरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्टजे, क्वेना मफाका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

रॅपिडो बाईक चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; कल्याणमध्ये खळबळ

Sunday Horoscope : लॉटरीमध्ये भरपूर पैसा मिळेल; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Kolhapur IT Park: कोल्हापुरात होणार आयटीपार्क, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी

कर्नाटकात भाकरी फिरणार; शिवकुमार मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT