Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

पचन सुधारण्यास मदत

जिरं आणि ओवा दोन्ही पचनासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे पाणी पिल्याने अन्न पचायला मदत होते आणि अपचनाची समस्या कमी होतात.

Jeera Water Benefits | Canva

गॅस आणि अॅसिडिटी कमी होते

ओव्यामध्ये असलेले गुणधर्म पोटातील गॅस आणि अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पोट हलके वाटते.

Jeera Water Benefits

वजन कमी करण्यास मदत

सकाळी रिकाम्या पोटी जिरं-ओवा पाणी पिल्याने मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

Jeera Water Benefits

पोटदुखीपासून आराम मिळतो

पोटदुखी किंवा पोट फुगण्याची समस्या असल्यास जिरं-ओवा पाणी फायदेशीर ठरते.

Jeera Water Benefits | Canva

शरीर डिटॉक्स करण्यास मदत

हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि शरीर स्वच्छ ठेवण्यास सहाय्य करते.

Jeera Water Benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

जिरं आणि ओवा दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Jeera Water Benefits

कसं तयार करायचं?

एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घालून उकळा. हे पाणी कोमट झाल्यावर सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास अधिक फायदा होतो.

Jeera Ajwain Water Benefits | Yandex

Dadpe pohe Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी तयार करा महाराष्ट्रीयन स्पेशल दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

Dadpe pohe Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा