Thane : मोठी बातमी! ठाणे जिल्ह्यात ED अन् ATS ची छापेमारी, मध्यरात्रीपासून झाडाझडती, अनेक घरांमध्ये...

ED ATS joint midnight raid in Thane district : ठाणे जिल्ह्यात ईडी आणि एटीएसकडून मध्यरात्री बोरीवली गावात मोठी छापेमारी करण्यात आली. अनेक घरांमध्ये झाडाझडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे व उपकरणे जप्त केली.
Maharashtra ATS
Maharashtra ATSSaam Tv
Published On

ED-ATS Raid At Thane : सक्तवसुली संचालनालय (ED) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे मध्यरात्री ठाणे पडघा येथील बोरिवली गावात मोठी कारवाई केली आहे. 'दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी अन् एटीएसच्या पथकाने छापेमारी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गावात तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बोरीवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथके दाखल झाली असून रात्रभर झडती घेतली जात आहे. या छापेमारीनंतर बोरीवली गावात स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ईडी आणि एटीएसकडून मध्यरात्री पडघाच्या शेजारी असलेल्या बोरीवली गावात छापेमारी केली. अनेक घरात झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर गावात तणावग्रस्त वातावरण झाले. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ⁠साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसने पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली गावावर मोठी कारवाई केली होती. साकीब हा बोरीवली गावचा रहिवाशी होता.

Maharashtra ATS
Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

भिवंडी जवळच्या पडघामधील बोरीवली गावाने स्वतंत्र मंत्रीमंडळ, स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना तयार केली होती.⁠ साकीबने ⁠बोरीवली गाव हा वेगळा देश म्हणून घोषीत केले होते. त्याने या गावाला ⁠अल शाम असं नाव दिले होते. ⁠स्वतःची राज्यघटना, स्वतःचे मंत्रीमंडळ साकीबने तयार केले होते.

Maharashtra ATS
ऐकावं ते नवलच! चक्क कांदा-लसणामुळे घटस्फोट, तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला

साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. आज पोलिसांनी बोरीवली गावात अचानक छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी अन् एटीएसच्या या धाडीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

Maharashtra ATS
Municipal Elections : महापालिका निवडणुकीचा फटका दहावी-बारावीच्या मुलांना, कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com