Pune Municipal Election: मोठी बातमी! कुख्यात गुंड पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Court allows Bandu Andekar to contest Pune municipal elections : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह भावजय आणि सुनेला महापालिका निवडणूक लढवण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे. आयुष कोमकर हत्याप्रकरणी बंडू आंदेकर आरोपी आहेत. त्यांना मनपा निवडणूक लढवण्यास न्यायालयाची परवानगी दिली आहे.
पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने आंदेकरांना निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढवण्याचे परवानगी मागण्यासाठी मिथुन चव्हाण यांच्या मार्फत आंदोरकारंनी न्यायालयात अर्ज केला होता. निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
