India vs England 5th Test x
Sports

Ind vs Eng : ओव्हल कसोटीत भारताचा विजय पक्का, इंग्लंडला जिंकण्यासाठी मोडावा लागेल १२३ वर्ष जुना विक्रम

India vs England 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी निर्णायक वळणावर आहे. इंग्लंडला कसोटी सामना जिंकण्यासाठी ३७४ धावा कराव्या लागणार आहे.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी शेवटच्या टप्प्यावर आहे.

  • इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य आहे, तर भारताला ८ विकेट्स घेतल्या आहे.

  • हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला १२३ वर्ष जुना विक्रम मोडावा लागणार आहे.

India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी सध्या एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडची धावसंख्या ५०/१ अशी होती. कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला अजून ३२४ धावा करायच्या आहेत, दुसऱ्या बाजूला ८ विकेट्स घ्यायच्या आहेत.

ओव्हल क्रिकेट मैदानावर कोणत्याही कसोटी संघाने ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष गाठलेले नाही. या स्टेडियमवर आतापर्यंत कसोटी सामन्यामध्ये सर्वात मोठा रनचेज २६३ धावांचा आहे. १९०२ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हा रनचेज केला होता. त्यानंतर १९६३ मध्ये २५३ धावांचे रनचेज आणि १९७२ मध्ये २४२ धावांचे रनचेज केले होते. जर भारताविरुद्ध ओव्हल कसोटी इंग्लंडला जिंकायची असेल, तर त्यांना १२३ वर्ष जुना विक्रम मोडावा लागेल.

२६३- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ११ ऑगस्ट १९०२

२५३- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, २२ ऑगस्ट १९६३

२४२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, १० ऑगस्ट १९७२

२२५- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ४ ऑगस्ट १९८८

२१९- श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, ६ सप्टेंबर २०२४

ओव्हल कसोटीमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या. पहिल्या डाव्यामध्ये भारताच्या करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या, इंग्लंडच्या गस एटकिन्सनने ५ विकेट्स घेतल्या. पुढे २४७ धावांवर इंग्लंडचा संघ ऑलआउट झाला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावा केल्या. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. त्याच्यासाथीने नाइट वॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीपने ६६ धावांची तगडी खेळी केली. वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी अर्धशतक झळकावले. तिसऱ्या दिवशी भारताचा संघ ३९६ धावांवर ऑलआउट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT