Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Ind vs Eng 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यामध्ये राडा झाला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या शेवटी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ind vs Eng 5th Test
Ind vs Eng 5th Testx
Published On
Summary
  • भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीत राडा

  • यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला

  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

India vs England 5th Test : ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. लंचला जाण्यापूर्वी यशस्वी जैस्वाल आणि झॅक क्रॉली, ऑली पोप यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत यशस्वी जैस्वाल ८५ धावांवर नाबाद खेळत होता. नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाश दीप ९४ चेंडूंमध्ये ६६ धावा करुन माघारी परतला होता. क्रीजवर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल होते. पहिल्या सत्रात भारत इंग्लंडवर वरचढ ठरला होता. पण सत्र संपायच्या आधी मैदानामध्ये वाद झाला.

Ind vs Eng 5th Test
Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

लंचसाठी निघाल्यानंतर इंग्लंडचे झॅक क्रॉली आणि ऑली पोप हे सलामीवीर यशस्वी जैस्वालशी वाद घालू लागले. पहिल्या सत्राच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जैस्वाल लंगडताना दिसला. यशस्वीने लंगडण्याचे नाटक करुन वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केल्याचे इंग्लंडच्या खेळाडूंचे मत होते. यावरुनच क्रॉली-पोप आणि जैस्वाल यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे म्हटले जात आहे.

दुसऱ्या सत्रामध्ये यशस्वी जैस्वालने त्याच्या १०० धावा पूर्ण केल्या. ओव्हलमधे शतकीय खेळी करत त्याने इतिहास रचला. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमधील पहिल्या कसोटीत यशस्वीने १०१ धावा केल्या होत्या. आता त्याने शेवटच्या ओव्हल कसोटीत शतकीय खेळी केली आहे. कसोटी कारकीर्दीतील जैस्वालचे हे सहावे शतक आहे.

Ind vs Eng 5th Test
Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com