Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

Jasprit Bumrah Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याची माहिती समोर आली. यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrahx
Published On

Jasprit Bumrah News : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह सामील झाला नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला शेवटच्या कसोटीत न खेळवण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. या मालिकेदरम्यान भारतासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. आशिया कप २०२५ मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आशिया कप ९ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. त्याच दरम्यान वेस्ट इंडियन संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जर बुमराह आशिया कपमध्ये सामील झाला, तर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. आता बुमराह आशिया कप खेळणार की कसोटी मालिका खेळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jasprit Bumrah
Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

जर जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळला, तर त्याला एका महिन्याचा ब्रेक दिला जाईल. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळताना दिसू शकेल. पण त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळता येणार नाही. बुमराहविषयीचा हा निर्णय अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना घ्यावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

Jasprit Bumrah
Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

जसप्रीत बुमराहला कसोटी खेळणे आवडते आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे आहेत. टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास बुमराह जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत खेळू शकतो. २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. परिणामी जसप्रीत बुमराह कसोटी खेळणार की आशिया कप खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jasprit Bumrah
Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com