Ind vs Eng 4th Test x
Sports

Ind vs Eng : ६ धावांमध्ये ४ विकेट्स! भारताचा डाव २२४ धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवशी टीम इंडिया बॅकफूटवर

Ind vs Eng 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी सुरु आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने फक्त ६ धावांवर ४ गडी गमावले आहेत. सामन्यात इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी द ओव्हल येथे सुरु आहे.

  • या कसोटीमध्ये भारताचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आला आहे.

  • दुसऱ्या दिवशी भारताने सलग ४ विकेट्स गमावल्या आहेत.

Ind vs Eng 5th Test : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील शेवटचा कसोटी सामना ओव्हल, लंडन येथे सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा संघ बॅकफूटवर असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी फक्त ६ धावांमध्ये भारताचे सलग ४ खेळाडू लागोपाठ बाद झाले. भारताचा डाव २२४ धावांवर संपुष्टात आला. फलंदाजीमध्ये टीम इंडियाने अनेक चूका केल्या आहेत.

बेन स्टोक्स दुखापतग्रस्त असल्याने भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीमध्ये सामील झाला नाही. त्याच्या जागी ऑली पोपकडे इंग्लंडचे नेतृत्त्व सोपवण्यात आले. ऑली पोपने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सुरुवातापासूनच इंग्लंडने भारताला धक्के द्यायला सुरुवात केली.

यशस्वी जैस्वाल २ धावा आणि केएल राहुल १४ धावांवर माघारी गेले. तिसऱ्या क्रमावर उतरलेल्या साई सुदर्शनने ३८ धावा केल्या. शुभमन गिल २१ धावांवर रनआउट झाला. करुण नायर टिकून खेळला. त्याने अर्धशतकीय खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरने २६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी करुण नायरच्या विकेटनंतर सुंदरही बाद झाला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्यावर बाद झाल्याने भारताची धावसंख्या २२४ धावांवर पोहोचली. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी सुरु झाली.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सध्या इंग्लंडचा संघ आघाडीवर आहे. इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत. भारताने एकमेव एजबॅस्टन कसोटीमध्ये विजय मिळवून इतिहास रचला आहे. तर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली आहे. भारत १-२ ने पिछाडीवर आहे. भारताला शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करायची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

Maharashtra Live News Update : सायना नेहवालने घटस्फोटातून घेतली माघार

Mahadevi Elephant: महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं? महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल?

Mumbai-Pune : मुंबई-पुणे फक्त दीड तासात, काय आहे नवा प्लान| VIDEO

Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

SCROLL FOR NEXT