
बलात्कार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी
बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने रेवण्णांच्या विरोधात दिला निकाल
न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर रेवण्णा यांना कोसळलं रडू
बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयाने माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवले आहे. उद्या (२ ऑगस्ट) त्यांची शिक्षा जाहीर केली जाणार आहे. न्यायालयाने दिलेला निकाल ऐकल्यानंतर प्रज्वल रेवण्णा भावूक झाले आणि रडू लागले. बंगळुरूमधील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित खटल्यांची सुनावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाचा निकाल ऐकल्यावर रेवण्णा न्यायालयातून बाहेर पडतानाही रडत असल्याचे म्हटले जात आहे.
हासन मतदारसंघाचे जेडीए पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये साडी हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. रेवण्णा यांच्यावर त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर एकापेक्षा जास्त वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओही पुरावा म्हणून उपलब्ध आहे. तिची साडी मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली. त्या साडीवर शुक्राणूंचे ठसे आढळल्याने तपासात मोठी मदत झाली.भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या अनेक कलमांखाली प्रज्वल रेवण्णा विरुद्ध आरोप सिद्ध झाले आहेत. न्यायालय उद्या त्यांच्या शिक्षेची घोषणा करणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
म्हैसूरमधील केआर नगर येथील एका घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात सीआयडी सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी खासदाराने पीडितेवर बलात्कार केला आणि त्या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी सीआयडीच्या विशेष तपास पथकाने सुमारे २,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान पथकाने तब्बल १२३ पुरावे गोळा केले.
या प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सुरु झाली होती. तेव्हा न्यायालयात २३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. न्यायालयाने व्हिडीओ क्लिप्सचा फॉरेन्सिक अहवाल आणि घटनास्थळाच्या तपासणी अहवालांचाही आढावा घेतला. हा खटला अवघ्या सात महिन्यांत पूर्ण झाले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांंनी आपला निकाल राखून ठेवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.