Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा हादरा, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra : काँग्रेसचे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा

  • पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली, तर काँग्रेसला धक्का बसला

Maharashtra Political News : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अखेर प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून ते काँग्रेस पक्षावर नाराज होते. जालना जिल्ह्यामध्ये कैलास गोरंट्याल यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचे आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

२०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये शिवसेना पक्षात फूट पडली होती. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. या दरम्यान ५० खोके, एकदम ओके ही घोषणा राज्यात गाजली होती. या घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. पण ही घोषणा देणे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

Maharashtra Politics
Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्याच्यासोबत शिवसेनेतील त्यांचे समर्थक गुवाहाटीला पोहोचले होते. काहीजण मागून शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुतीची सत्ता आली होती. या संपूर्ण प्रकरणादरम्यान '५० खोके, एकदम ओके' ही घोषणा प्रसिद्ध झाली होती.

Maharashtra Politics
Nalasopara : शिक्षिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारला कॉलिन स्प्रे, पालकांच्या तक्रारीनंतर शाळेला कुलूप ठोकलं

५० खोके, एकदम ओके ही घोषणेचा जनक असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीपासूनच ते काँग्रेस पक्षामध्ये नाराज असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. भाजप नेत्यांनी संवाद साधल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सुरु असलेल्या पक्षांतराच्या चर्चांवर कैलास गोरंट्याल यांनी शिक्कामोर्तब केले.

Maharashtra Politics
Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com