Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

Manikrao Kokate News : पावसाळी अधिवेशनामध्ये रमी खेळल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या रमी प्रकरणामुळे त्यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSaam Tv
Published On
Summary
  • रमी प्रकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे भोवणार?

  • कोकाटेंकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा

  • दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे जाणार कृषी खात्याची जबाबदारी

Maharashtra Politics : पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाचे कामकाज सुरु असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना दिसले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या रमी प्रकरणामुळे विरोधकांनी कोकाटेंना धारेवर धरले होते. आता याच ऑनलाईन रमी व्हिडीओमुळे माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सभागृहात कामाच्यामध्ये कृषिमंत्री कोकाटे रमी खेळत होते असा दावा विरोधकांनी केला होता. या दाव्यावर कोकाटे यांनी मी युट्यूबवर व्हिडीओ पाहत होतो, तेव्हा रमीचा जाहिरात आली असे स्पष्टीकरण दिले होते. पण या रमी प्रकरणामुळे विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणामुळे महायुती सरकारवर दबाव येत असल्याने कोकाटे यांचे खाते काढून घेतले जाणार असे म्हटले जात आहे.

Manikrao Kokate
Malegaon Blast Verdict: दहशतवाद आणि जिहादचा रंग हिरवाच; मालेगाव खटल्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया|VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून राजीनामा न घेता कृषिमंत्रीपद दुसऱ्या नेत्याकडे सोपवले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

Manikrao Kokate
Devendra Fadnavis: मालेगाव निकालावर देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले... VIDEO

कृषिमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाची घोषणा लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. मकरंद पाटील किंवा दत्ता भरणे यांच्यापैकी एकाकडे कृषिमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडील एक खाते माणिकराव कोकाटे यांना दिले जाऊ शकते असे म्हटले जात आहे. कोकाटे यांना क्रीडा खाते मिळणार असल्याची चर्चा आहे.

Manikrao Kokate
Malegaon Blast Case : RSS नेत्याच्या हत्येचा आरोप, मालेगाव प्रकरणात निर्दोष; प्रज्ञा सिंह ठाकूर कोण आहेत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com