Beed : कृष्णा आंधळेचा खून, वाल्मिक कराडने २५ जणांची हत्या केली, माझ्याकडे पुरावे; बडतर्फ पीएसआयचा खळबळजनक दावा
बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांचा खळबळजनक दावा
वाल्मीक कराडने परळीत २५ जणांची हत्या केली असा दावा कासले यांनी केला.
फरार कृष्णा आंधळेचा खून झाला, त्याचे पुरावे माझ्याकडे असे कासले म्हणाले.
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
बीड : 'वाल्मीक कराडने परळीमध्ये कमीत-कमी २५ जणांची हत्या केली आहे, आता आणखी एका १४ वर्षीय मुलाचा खून झाला आहे', असा धक्कादायक दावा बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे, त्याचा खून झाली आहे की काय? असेही कासले यांनी म्हटले.
'मला दिल्लीतील एका लॉजमधून उचलण्यात आलं. गृहमंत्र्यांनी बोलावलंय, माझ्या जीवाला धोका आहे असे सांगून मला अटक करण्यात आली. माझ्या बॅगा गायब झाल्या. त्यातील पेपर गायब झाले. त्यातील पुरावे, पेन ड्राईव्ह सगळं काढून घेतलं. त्यामध्ये परळीतील कांडाचे पुरावे होते. फरार कृष्णा आंधळेचे देखील पुरावे होते. कृष्णाचा खून झाला आहे की काय? हे सगळं आता मी पुराव्यानिशीच बोलणार आहे. सरकारने माझे खोटे गुन्हे परत घेतले, तर मी पुरावे द्यायला तयार आहे', असे रणजीत कासले म्हणाले आहेत.
'वाल्मीक कराडने परळीत कमीत-कमी २५ जणांची हत्या केल्या आहेत. काहीचे तुकडे करुन नदीमध्ये, तळ्यामध्ये टाकले असतील, काहींना बॉयलरमध्ये टाकले असेल. तो मला आजही त्रास देतोये, जेलमधून फोन करतोय. माझ्याकडे आणखी एका हत्येचे पुरावे आहेत, जे मी दुसऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दाखवेन. एका १४ वर्षांच्या मुलाची हत्या कशाप्रकारे झाली, ते दाखवतो. फोटो आहेत माझ्याकडे', असा दावा बडतर्फ कासले यांनी केला आहे.
रणजीत कासले व्हिडीओमध्ये म्हणाला, 'महादेव मुंडे हत्या प्रकरणादरम्यानचं एसपी आणि वाल्मीक कराडचे कॉल डिटेल्स चेक करा. तेव्हा कळेल खरा आरोपी कोण आहे. तत्कालीन एसपी नंदकुमार ठाकूर आणि वाल्मीक कराडचे दिवसातून दहा कॉल व्हायचे. एसपी ऑफिस आणि पोलीस स्टेशन वाल्मीक कराड चालवायचा. सायबर टीमधल्या कोळी मॅडमसोबतच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तो म्हणतोय मी बाप आहे यांचा. बघा त्याची दहशत आणि तो किती विकृत होता ते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.