Accident News
Accident Newsx

Accident : रक्षाबंधनापूर्वीच भावाबहिणीची ताटातूट, बहिणीला शाळेत सोडलं अन्...; कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

Accident News : बहिणीला शाळेत सोडून एक तरुण घरी जात होता. त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक बसली. भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्याची बहीण बेशुद्ध पडली.
Published on
Summary
  • एका तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

  • तरुण बहिणीला शाळेत सोडून घरी परतत होता.

  • भावाच्या मृत्यूच्या बातमीने बहिणी बेशुद्ध पडली.

Shocking Accident : आयटीआयचे शिक्षण घेणारा एक तरुण त्याच्या बहिणीला शाळेत सोडायला गेला होता. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर परतत असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. दुसऱ्या दुचाकीला तरुणाची दुचाकी धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाव्यतिरिक्त आणखी तिघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव अभय यादव असे आहे. अभय हा आयटीआयचा विद्यार्थी होता. तो सकाळी सीओडी गेट येथील केंद्रीय विद्यालयामध्ये त्याच्या बहिणीला सोडण्यासाठी गेला होता. तिला शाळेत सोडल्यानंतर तो दुचाकीवरुन घरी परतत होता. त्याचे घर नैनी पोलीस स्टेशन परिसरात आहे.

Accident News
Court Verdict : मोलकरणीवरील बलात्कार प्रकरणी माजी खासदार दोषी; निकालानंतर कोर्टातच रडला

बहिणीला शाळेत सोडून आल्यानंतर एफसीआय रोडवरील एका खासगी महाविद्यालयासमोर अभयच्या दुचाकीचा अपघात झाला. त्याची दुचाकी समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात अभय गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी अभयला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरु करण्याआधीच डॉक्टरांनी अभयला मृत घोषित केले. दुसऱ्या दुचाकीवर बसलेले तरुण देखील दुखापतग्रस्त झाले आहेत.

Accident News
Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा हादरा, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस उरले आहेत. हा सण साजरा करण्याआधीच अभयच्या बहिणीने तिच्या भावाला अपघातात गमावले. शाळा संपल्यानंतर ती अभयची वाट पाहत होती. तिला जेव्हा तिच्या भावाच्या, अभयच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा ती बेशुद्ध पडली. बहिणीला शाळेत सोडतानाचा अभय यादवचा प्रवास हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा प्रवास ठरला.

Accident News
Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com