r ashwin saam tv news
Sports

R Ashwin Record: आर अश्विनचा नादखुळा! इंग्लंडविरुद्ध असा रेकॉर्ड करणारा ठरलाय नंबर १ भारतीय गोलंदाज

Most Wickets Against England: वायझॅग कसोटीत इंग्लंडला जिंकण्यासाठी ३९९ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. या धावांचा बचाव करताना भारतीय फिरकीपटू आर अश्विन सुरेख गोलंदाजी करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test, R Ashwin Record News:

वायझॅग कसोटीत इंग्लंडला जिंकण्यासाठी ३९९ धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. या धावांचा बचाव करताना भारतीय फिरकीपटू आर अश्विन सुरेख गोलंदाजी करताना दिसून आला आहे. दरम्यान दुसऱ्या डावात तिसरा गडी बाद करताच त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने दिग्गज भारतीय गोलंदाज बीएस चंद्रशेखर यांना मागे सोडलं आहे. (R Ashwin Record news)

आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध खेळताना ९७ गडी बाद केले आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड बीएस चंद्रशेखर यांच्या नावावर होता. त्यांनी ९५ गडी बाद केले होते. तर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या स्थानी आहेच. त्यांच्या नावे इंग्लंडविरुद्ध खेळताना ९२ गडी बाद करण्याची नोंद आहे. (Most wickets against england)

विशाखापट्टनममध्ये सुरु असलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. मात्र दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यादरम्यान त्याने बेन डकेट, ओली पोप आणि जो रुटला बाद करुन माघारी धाडलं आहे. हे तिन्ही इंग्लंडचे महत्वाचे फलंदाज आहेत. बेन डकेट २८ धावा करत माघारी परतला. तर पोपने २३ आणि जो रुटला अवघ्या १६ धावा करता आल्या. (Cricket news in marathi)

इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज..(Indian bowlers with most wickets against england in test cricket)

आर अश्विन- ९७ गडी

बीएस चंद्रशेखर- ९५ गडी

अनिल कुंबळे- ९२ गडी

बिशनसिंग बेदी- ८५ गडी

कपिल देव - ८५ गडी

इशांत शर्मा - ६७ गडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ वर्ग, एक खोली अन् एकच शिक्षक... जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

Flax Seeds Laddu Recipe : हिवाळ्यात सांधेदुखी होईल दूर, रोज खा जवसाचा पौष्टिक लाडू

Jowar Khichdi Recipe: डाईट सुरु केला आहे पण टेस्टी खायची इच्छा होते? मग रात्री घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी ज्वारीची खिचडी

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

New Marathi Serial : "प्रेम की पैसा..."; 'झी मराठी'वर सुरू होणार नवीन मालिका, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?

SCROLL FOR NEXT