Yashasvi Jaiswal Catch Drop x
Sports

Yashasvi Jaiswal : बॅटिंगमध्ये कमावलं, पण फिल्डिंगमध्ये गमावलं; यशस्वी जैस्वालने सोडल्या चार कॅच, VIDEO

Yashasvi Jaiswal Catch Drop : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सध्या निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सामन्यामध्ये यशस्वी जैस्वालने खराब क्षेत्ररक्षण केले आहे. त्याने संपूर्ण सामन्यात चार महत्त्वाच्या कॅच सोडल्या आहेत.

Yash Shirke

Ind Vs Eng यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये ५ भारतीय फलंदाजांनी शतकीय कामगिरी केली. रिषभ पंतने तर दोन डावांमध्ये दोन शतके झळकावली आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्याच दिवशी शतक ठोकले होते. कसोटी सामन्यात जैस्वाल फलंदाजीमध्ये चमकला पण क्षेत्ररक्षण करताना त्याने अनेक चुका केल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये यशस्वी जैस्वालने एकूण चार कॅचेस सोडल्या आहेत. पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात एक अशा प्रकारे जैस्वालने क्षेत्ररक्षण करताना चुका केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने एक महत्त्वाची कॅच सोडली होती. तिसऱ्या दिवशी स्लिपमध्ये असताना चेंडू झेलताना त्याच्याकडून चूक झाली होती. पाचव्या दिवशी देखील यशस्वीमुळे विकेट घेण्याची संधी हुकली.

दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज ३९ ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. पाचव्या चेंडूवर बेन डकेटने पुल शॉट मारला, पण नियंत्रण सुटल्याने विकेटची संधी निर्माण झाली. तेव्हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरुन यशस्वी जैस्वाल धावत आला. त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जैस्वालच्या हातातून निसटला. बेन डकेटला जीवनदान मिळाले आणि त्याने शतक ठोकले.

पहिल्या डावामध्येही यशस्वी जैस्वालने बेन डकेटची कॅच सोडून त्याला जीवनदान दिले होते. त्यानंतर डकेटने ६२ धावा केल्या होत्या. ३१ व्या ओव्हरच्या सहाव्या चेंडूवर जैस्वालने ओली पोपची कॅच सोडली होती. त्यानंतर पोपने १०६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने हॅरी ब्रूकचा तिसरा कॅच सोडला होता. या चार चुकांमुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT