Shubman Gill : एकीकडून मोहम्मद, दुसरीकडून कृष्णा, दोघे...; Ind Vs Eng सामन्यादरम्यान शुभमन गिलचे विधान चर्चेत, Video

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यातील पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shubman Gill
Shubman Gill x
Published On

Leeds च्या हेडिंग्ले स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड हा पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. भारताने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर ९० ओव्हर्समध्ये ३५० धावांचे आव्हान असताना पहिल्या सत्राला सुरुवात झाली. सामन्यादरम्यान भारतीय कसोटी क्रिकेटचा नवा कर्णधार शुभमन गिलच्या एका व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे.

Shubman Gill
Ind Vs Eng कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळात अनपेक्षित 'खोडा'! Leeds मधून आले महत्त्वाचे अपडेट्स

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शुभमन गिल भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. बोलत असताना 'एका टोकाला मोहम्मद आहे, तर दुसऱ्या टोकाला कृष्णा' आहे, असे वक्तव्य शुभमन गिलने केले. स्टम्पमाईकमध्ये ही गोष्ट रेकॉर्ड झाली. गिलच्या या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Shubman Gill
Ind Vs Eng : टीम इंडिया इतिहास रचणार? कारण लीड्सवरील ७७ वर्षाचा इतिहास सांगतोय भारत जिंकणार...

'एकीकडे मोहम्मद (मोहम्मद सिराज) आहे, तर दुसरीकडे कृष्णा (प्रसिद्ध कृष्णा) आहे. दोघेही कहर करतील', असे शुभमन गिल म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे. सध्या भारतासमोर इंग्लंडला रोखण्याचे आव्हान आहे. पहिले सत्र संपेपर्यंत भारताला एकही विकेट मिळालेली नाही. यामुळे गिल सहकाऱ्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

Shubman Gill
Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, इंग्लंडमध्ये घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या होत्या. प्रसिद्ध कृष्णाने ३ आणि मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले. दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत एकही विकेट मिळालेली नाही. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी (बुमराहचा अपवाद वगळता) फारशी चांगली कामगिरी केली नाही.

Shubman Gill
Rishabh Pant : दोन डावात दोन शतकं ठोकणाऱ्या रिषभ पंतला आयसीसीचा दणका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com