Ind Vs Eng 1st Test x
Sports

Ind Vs Eng : यांच्यापेक्षा मोहम्मद शमी परवडला, खराब कामगिरीमुळे भारतीय गोलंदाज टीकेचे धनी, सोशल मीडियावर ट्रोल

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. सोशल मीडियावर भारतीय गोलंदाज ट्रोल होत आहेत.

Yash Shirke

India Vs England पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाज संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रामध्ये टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सत्रात पाऊस आल्यानंतर झॅक क्रॉलीच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळाली. एकूणच कामगिरीवरुन चाहत्यांनी गोलंदाजांवर टीका केली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यामध्ये पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच गडी बाद केले होते. एकाप्रकारे त्याने गोलंदाजी विभाग सांभाळला होता. दुसऱ्या डावामध्येही बुमराहने इतर भारतीय गोलंदाजांच्या तुलनेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपर्यंत त्यालाही विकेट मिळवता आलेली नाही.

दुसऱ्या बाजूला मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा हे गोलंदाज संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही मोहम्मद सिराजला सर्वाधिक ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहेत. काहीजणांनी मोहम्मद सिराजपेक्षा जखमी, दुखापतग्रस्त मोहम्मद शमी कधीही चांगला असे म्हटले आहे. फक्त सिराजच नाही, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरवरही टीका होत आहे.

मोहम्मद शमीचे इंग्लंड विरुद्धचे आकडे चांगली आहेत. त्याने इंग्लंडच्या विरुद्ध खेळताना २७ कसोटी डावांमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंडच्या मैदानावर शमीने २५ कसोटी डावात २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बाकी गोलंदाजांपेक्षा मोहम्मद शमी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी जास्त पात्र होता असे चाहते म्हणत आहेत.

भारतीय गोलंदाजांनी फक्त गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीमध्येही खराब कामगिरी केली आहे. दोन्ही डावांमध्ये सहावी किंवा सातवी विकेट पडल्यानंतर भारताचे खेळाडू लागोपाठ बाद होत असल्याचे पाहायला मिळाले. यात प्रामुख्याने भारतीय गोलंदाजांचा समावेश होता. या तुलनेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी टिकून फलंदाजी केली. याचा फायदा इंग्लंडच्या संघाला झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crop Insurance : शेतकऱ्यांना विम्याची तुटपुंजी रक्कम; पिक विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी घातला घेराव

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज? मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

Blood cancer symptoms: भारतातील तरुणांमध्ये वाढतोय 'हा' ब्लड कॅन्सर; गंभीर आजारावर नवी थेरेपी ठरतेय फायदेशीर

Gold- Silver Price: सोनं-चांदीला चकाकी, दर वाढल्यामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ; जळगावच्या सुवर्णनगरीत आजचे भाव किती?

Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT