IND vs AUS 5th T20
IND vs AUS 5th T20 Saam Tv
क्रीडा | IPL

IND vs AUS 5th T20: 0 0 W 1 1 1...शेवटच्या षटकात अर्शदीपनं ऑस्ट्रेलियाला 'वेड' लावलं; टीम इंडियाचा ६ धावांनी रोमहर्षक विजय

Bharat Bhaskar Jadhav

IND vs AUS 5th T20 Team India won :

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात झालेल्या पाचव्या आणि मालिकेच्या अखेरच्या सामन्यात शेवटपर्यंत रोमांच कायम राहिला. अखेरच्या षटकात अर्शदीपने एक विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे टीम इंडियाने विश्वविजेत्या संघाला ६ धावांनी पराभूत करत मालिका ४-१ ने जिंकली. बेंगळुरूच्या के एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात पाचवा टी२० सामना खेळला गेला. (Latest News)

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला १६० धावांचे आव्हान पार करता आले नाही. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयासाठी १० धावा लागत होत्या. अखेरचं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग सोपवण्यात आला होता. परंतु आपला कमालीचा खेळ दाखत अर्शदीपने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना विजयापासून दूर ठेवलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्शदीपने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडला बाद केलं. वेडने २२ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला अखेरच्या तीन चेंडूत १० धावा करायच्या होत्या. परंतु अर्शदीप हुशारीने गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला फक्त तीन धावा दिल्या आणि संघाला ६ धावांनी विजय मिळवून दिला.

दरम्यान भारताकडून गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ४ षटकात १४ धावा देत १ गडी बाद केला. तर मुकेश कुमारने ४ षटकात ३२ धावा देत ३ बळी घेतले. या सामन्यात अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिलं. भारतीय संघाने ८ विकेट गमावत १६० धावा केल्या. संघाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ३१ धावांची दमदार खेळी केली. कांगारू संघाकडून बेन डोरिस आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारूंच्या संघाने सावध सुरूवात केली. परंतु ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडच्या संघाला २० षटकात आठ गडी गमावत फक्त १५४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या. परंतु तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT