Abdul Razzaq Statement: 'बरं झालं टीम इंडिया हारली...', ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजयानंतर पुन्हा बरळला पाकिस्तानी खेळाडू

Abdul Razzaq On Team India: पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाकने भारतीय खेळाडूंचा खिल्ली उडवली आहे. ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

Abdul Razzaq Statement On Team India:

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या धक्क्यातून अजूनही भारतीय खेळाडू बाहेर येऊ शकलेले नाहीत. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये भारतीय संघाच्या पराभवाचा जल्लोष सुरु आहे.

सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंना ट्रोल करणारे मीम्स व्हायरल होत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाकने भारतीय खेळाडूंचा खिल्ली उडवली आहे. ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वर्ल्डकपची फायलन झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका चॅट शोमध्ये अब्दुल रज्जाकने भारतीय संघाने खेळपट्टीसोबत छेडछाड करण्याचा आरोप केला. बरं झालं भारताचा संघ फायनलमध्ये हरला,असंही त्याने म्हटलं आहे.

हा क्रिकेटचा विजय..

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने 'हंसना मना है..'या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये बोलताना तो म्हणाला की,'भारतीय खेळाडू ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते. हा क्रिकेटचा विजय आहे आणि भारताचा पराभव आहे.

जर भारतीय संघाने हा सामना जिंकला असता तर हे क्रिकेटसाठी खूप वाईट झालं असतं. त्यांनी परिस्थितीचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. मी आयसीसीच्या फायनलमध्ये याहून खराब खेळपट्टी कधीच पाहिली नव्हती. भारतीय संघ हरला हे क्रिकेटसाठी बरंच झालं.' (Latest sports updates)

team india
IND vs AUS, Last Over: W,W,W अन् रिंकूचा मॅचविनिंग षटकार; शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

फायनलमध्ये भारताचा पराभव..

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं.

भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती. तर विराटने अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर दुसरीकडे भारतीय संघाने तिसऱ्यांदा वर्ल्डकप फायनल जिंकण्याची संधी गमावली आहे.

team india
Ind vs Aus 1st T20I: सूर्याने कॅप्टन बनताच रचला इतिहास! पहिल्याच सामन्यात मोडला रोहित,धोनी अन् विराटला न जमलेला रेकॉर्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com