भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनममध्ये पार पडला. या सामन्यात जोरदार कामगिरी करत भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला.
या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १- ० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने असं काही करुन दाखवलं आहे, जे आजवर कुठल्याच भारतीय कर्णधाराला करता आलं नव्हतं.
ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताने रचला इतिहास...
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ३ गडी बाद २०८ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावांची गरज होती. हे आव्हान भारतीय संघाने १ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केलं. (Suryakumar Yadav)
शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला विजयासाठी १ धावेची गरज होती. शेवटी रिंकू सिंगने षटकार मारला आणि विजय मिळवून दिला. मात्र हा चेंडू नो असल्याने भारतीय संघाने १ चेंडू राखून हा सामना जिंकला. हा टी -२० क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारतीय संघाने २०८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. (Latest sports updates)
हा भारतीय संघाचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. भारतीय संघाने या सामन्यात २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी भारतीय संघाने २०१९ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात २०८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. (India vs Australia)
तर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात २०७ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. यासह भारतीय संघाच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारे संघ:
भारत- ५ वेळेस
दक्षिण आफ्रिका- ४ वेळेस
पाकिस्तान- ३ वेळेस
ऑस्ट्रेलिया -३ वेळेस
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.