आयपीएल २०२३ स्पर्धेत एकच नाव प्रचंड चर्चेत राहिलं ते म्हणजे रिंकू सिंग. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्स संघाची चांगलीच हवा काढली होती. त्याने या सामन्यातील शेवटच्या षटकात ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
आता रिंकू अशाच एक दमदार कामगिरीमूळे पून्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने यूपी टी-२० लीग स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात त्याने सुपर ओव्हरमध्ये ३ षटकार मारले आहेत.
यूपी टी-२० लीग स्पर्धेत रिंकू सिंग देखील अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना मेरठ विरूद्ध काशी या दोन्ही संघांमध्ये रंगला. हा सामना बरोबरीत समाप्त झाला.
त्यामुळे सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये काशी रुद्रास संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ चेंडूंमध्ये १६ धावा ठोकल्या होत्या. हा सामना जिंकण्यासाठी मेरठ संघाला जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. मेरठ संघाकडून रिंकू सिंग आणि दिव्यांश यांची जोडी मैदानावर आली होती.
सुपर ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रिंकू सिंगने लाँग ऑनच्या दिशेने षटकार मारला.षटकातील तिसरा चेंडू देखील रिंकू सिंगने मिड विकेटच्या दिशेने चेंडू ६ धावांसाठी फिरकावून दिला.तो इथेच थांबला नाही तर त्याने पुढच्या चेंडूवर त्याने लाँग ऑफच्या दिशेने षटकार मारत आपल्या संघाला सामना जिंकून दिला. (Latest sports updates)
भारतासाठी खेळणार...
रिंकू सिंगला आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली होती. त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली नाही.
मात्र वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. या संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.