IND vs PAK, Asia Cup 2023: विराट ते रोहित ...भारत- पाकिस्तान सामन्यात या ५ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

India vs Pakistan Players To Watch Out: भारत- पाकिस्तान हाय व्हॉल्टेज सामन्यात या ५ खेळाडूंच्या ५ कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत .
virat kohli with rohit sharma
virat kohli with rohit sharmasaam tv
Published On

Top Players To Watch Out In India vs Pakistan Match:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. २०१९ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.

स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघावर २३८ धावांनी विजय मिळवला आहे. तर भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करून विजयी सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

virat kohli with rohit sharma
Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्ध ईशान नव्हे तर संजू का आहे परफेक्ट चॉईस? दोघांचा रेकॉर्ड एकदा पाहाच

१) विराट कोहली-

विराट कोहली हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. सामना जेव्हा पाकिस्तानविरूद्ध असतो, त्यावेळी विराटची बॅट चांगलीच तळपते. पाकिस्तानविरूद्ध खेळताना त्याने ५० पेक्षाही अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

२)रोहित शर्मा-

पाकिस्तानविरूद्ध खेळताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील दमदार राहिला आहे. रोहितने आतापर्यंत पाकिस्तान संघाविरूद्ध खेळताना १६ वनडे सामन्यांमध्ये ५१.४२ च्या सरासरीने ७२० धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने २ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत.

३) बाबर आझम-

नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या कर्णधाराची बॅट चांगलीच तळपली होती. या सामन्यात त्याने १५१ धावांची खेळी केली होती. बाबर आझम सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याचा हा फॉर्म पाहता भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यातही तो मोठी खेळी करू शकतो. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सावध राहावं लागणार आहे. (Latest sports updates)

virat kohli with rohit sharma
Ind v Pak, Playing XI : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात! KL Rahul च्या जागी कोण?

४) जसप्रीत बुमराह-

आयर्लंडविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेतून जसप्रीत बुमराह कमबॅक करताना दिसून आला होता. या मालिकेत त्याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता. आतापर्यंत पाकिस्तानविरूद्ध झालेल्या ५ सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहने ४ गडी बाद केले आहेत. मात्र जो फॉर्ममध्ये आहे ते पाहता नक्कीच पाकिस्तानच्या ताफ्यात चिंतेचं वातावरण असेल.

५)शाहिन आफ्रिदी :

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी देखील सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने नेपाळविरूद्धच्या सामन्यातील पहिल्याच षटकात २ गडी बाद केले होते. आता भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज शाहिन आफ्रिदीविरूद्ध खेळताना कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com