क्रिकेटच्या (Cricket) मैदानात प्रत्येक खेळाडूला आपल्या खेळाची छाप सोडायची असते. क्रिकेट हा नेहमीच फलंदाजाचा खेळ मानला जातो आणि चाहत्यांनाही फलंदाजांची स्फोटर फलंदाजी पाहायला आवडते. भारतीय गोलंदाजांनी (Team India) सर्वत्र चांगली गोलंदाजी केली असून सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज भारताकडे आहेत.
मात्र, जगात असे अनेक स्फोटक फलंदाज आहेत जे प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्फोटक फलंदाजी करतात आणि विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी एका गोलंदाजाला टार्गेट करतात. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहिले असेल की अनेक दिग्गज गोलंदाजांना जास्त धावा खर्च कराव्या लागल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे तीन भारतीय गोलंदाज ज्यांनी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा खर्च केल्या.
कसोटी: हरभजन सिंग (27 धावा)
1998 ते 2016 पर्यंत भारतासाठी 103 कसोटी सामने खेळणारा हरभजन सिंग हा भारतासाठी ऑफस्पिनर म्हणून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. हरभजनच्या नावावर 103 सामन्यांत 417 बळी आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही हरभजनच्या नावावर आहे.
2006 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या लाहोर कसोटीत शाहिद आफ्रिदीने हरभजन सिंगला (Harbhajan Singh) एका ओव्हरमध्ये सलग 4 षटकार खेचून 27 धावा केल्या आणि फक्त 80 चेंडूत 103 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. कोणत्याही भारतीयाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्याचा हा विक्रम आहे. त्या सामन्यात हरभजन सिंगने 34 षटकात 176 धावा दिल्या होत्या आणि संपूर्ण सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आलेली नव्हती.
वनडे: युवराज सिंग (30 धावा)
स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारणाऱ्या युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर वनडेमध्ये भारतीयाकडून सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही आहे. 2007 मध्ये द ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध खेळताना युवराज सिंगला दिमित्री मस्करेन्हासच्या एका षटकात 5 षटकार मारले होते. युवराजने त्या षटकात 30 धावा दिल्या, जो कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा एकदिवसीय क्रिकेटमधील एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आहे.
T20: शिवम दुबे (34 धावा)
2 फेब्रुवारी 2020 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या T20 सामन्यात शिवम दुबेच्या पहिल्या आणि 10व्या षटकात टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी मिळून शिवम दुबेच्या गोलंदाजीवरती 34 धावा दिल्या होत्या. स्टुअर्ट बिन्नी यांच्या एका षटकात 30 धावा देण्याचा विक्रम मोडीत काढला होता. यादरम्यान शिवम दुबेच्या एका षटकात दोन्ही फलंदाजांनी 4 षटकार आणि 2 चौकार लगावले होते. तरीही भारताने हा सामना जिंकला होता आणि न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर टी20 मालिकेत 5-0 ने पराभूत केले होते.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.