Khalistani supporter: खलिस्तान समर्थकांचं गैरवर्तन; न्यूयॉर्कमधील गुरुद्वारात जाणाऱ्या भारतीय राजदूताला धक्काबुक्की

Indian Ambassador : खलिस्तानी समर्थकांनी न्यूयॉर्कमधील गुरुद्वारात भारतीय राजदूताला धक्काबुक्की केलीय. यावेळी या समर्थकांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली. भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू जेव्हा गुरुद्वारातून बाहेर पडत होते त्यावेळी समर्थकांनी खलिस्तानी झेंडा फडकावला.
Ambassador Taranjit Singh Sandhu
Ambassador Taranjit Singh SandhuSaam Tv

Ambassador Taranjit Singh Sandhu:

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या समर्थकांनी भारतीय राजदूताला धक्काबुक्की केल्याची घटना न्यूयॉर्कमध्ये घडलीय. पन्न यांच्या समर्थकांनी गुरूद्वारामध्ये भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू यांना धक्काबुक्की केली. याआधी ब्रिटेनमध्येही खलिस्तानी समर्थकांनी गुरुद्वाराच्या बाहेर भारतीय राजदुतासोबत गैरवर्तन केलं होतं. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटेननंतर न्यूयॉर्कमधील गुरुद्वारात भारतीय राजदूतासोबत गैरवर्तन करण्यात आलंय. राजदूत तरनजीत सिंह संधू हे न्यूयॉर्कच्या लॉन्ग आयलँड येथील गुरुद्वारात गुरू परब (गुरू नानक जयंती ) साजरी करण्यासाठी गेले होते. तेथे आधीपासून असलेल्या खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप केला. त्त्यानंतर त्यांना धक्का मारण्याचा प्रयत्न केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हरदीप सिंह निज्जरची हत्या केली आता पन्नू यांना मारण्याचा कट रचत आहात, असं हे खलिस्तानी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. तर तेथे असलेले इतर जण त्या समर्थकांना बाजुला करताना दिसत आहेत. यादरम्यान खलिस्तानी समर्थकांनी भारताविरोधात घोषणाबाजी केली. तर भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू जेव्हा गुरुद्वारातून बाहेर पडत होते त्यावेळी समर्थकांनी खलिस्तानी झेंडा फडकावला.

त्यानंतर राजदूत संधू यांनी गुरुद्वारा येथे झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला. दरम्यान ही घटना तेव्हा घडलीय जेव्हा अमेरिकेने भारतावर पन्नू यांना मारण्याचा आरोप लावला. पन्नू यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात आल्याचे वृत्त माध्यमातून आले होते

Ambassador Taranjit Singh Sandhu
India Canada News : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com