India Canada News : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी

India Canada Relations : तपास पूर्ण न करताच केले आरोप, निज्जर प्रकरणी भारतीय राजदूतांनी कॅनडाची काढली खरडपट्टी
Justin Trudeau News
Justin Trudeau NewsSaam Tv
Published On

India Canada Latest News :

भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी शनिवारी कॅनडाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले आहेत की, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या कॅनडाच्या भूमीवर झालेल्या हत्येचा तपास पुर्ण झालेला नाही. मात्र असे असतानाही कॅनडाने नवी दिल्लीला दोष दिला. निज्जर यांच्या हत्येसंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांचे पुरावे कॅनडाने सादर करावेत, अशी विनंती त्यांनी केली. भारतीय राजदूत म्हणाले की, जस्टिन ट्रुडो यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही संबंधित पुरावे दिले तर, भारत त्यावर विचार करेल.

CTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय कुमार वर्मा यांना हरदीप निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा कथित आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना वर्मा म्हणाले, "मी यावर दोन गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे तपास पूर्ण न होताच भारताला दोषी ठरवण्यात आले. हे कायद्याचे राज्य आहे का?" ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Justin Trudeau News
Rajasthan Election Voting : राजस्थानमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद! 'प्रथा बदलणार, काँग्रेसचं सरकार येणार', गेहलोत यांचा दावा

ते म्हणाले, "त्यांनी (कॅनडाने) भारताला सहकार्य करण्यास सांगितले. तुम्ही विशिष्ट गुन्हेगारी शब्दावली पाहिल्यास, जेव्हा कोणी सहकार्य करण्यास सांगते, तर याचा अर्थ तुम्हाला आधीच दोषी ठरविले गेले आहे आणि तुम्ही सहकार्य केल्यास, ते तुमच्यासाठी चांगलं होईल, असा होता."  (Latest Marathi News)

भारतीय राजदूत वर्मा म्हणाले, "म्हणून, आम्ही ते अगदी वेगळ्या पद्धतीने घेतले. परंतु, आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की, जर खूप विशिष्ट संबंधित माहिती असेल आणि ती आम्हाला सांगितली गेली तर, आम्ही त्याची चौकशी करू." परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कॅनडाने हत्येवर आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सादर केला नाही.

Justin Trudeau News
Rohit Pawar : आगामी निवडणुकींसाठी जातीत तेढ निर्माण करून राज्यात वातावरण तापवलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

दरम्यान, यावर्षी सप्टेंबर महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ब्रिटिश कोलंबियामध्ये 18 जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये कथित भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले होते.

भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. भारताने ट्रुडो यांचे आरोप फेटाळले होते. याच्याच काही दिवसानंतर भारताने जाहीर केले की, ते कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करत आहे. तसेच कॅनडाने भारतातील आपल्या राजदूतांची संख्या कमी करण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com