Rajasthan Election Voting : राजस्थानमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद! 'प्रथा बदलणार, काँग्रेसचं सरकार येणार', गेहलोत यांचा दावा

Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद! 'प्रथा बदलणार, काँग्रेसचं सरकार येणार', गेहलोत यांचा दावा
Rajasthan Election Voting
Rajasthan Election VotingSaam TV
Published On

Rajasthan Election 2023 Voting :

राजस्थान विधानसभा निवणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 68.24 टक्के मतदान झाले आहे. राज्यात, जैसलमेर जिल्ह्यात सुमारे 76.6 टक्के सर्वाधिक मतदान झाले आणि पाली जिल्ह्यात सर्वात कमी 60.7 टक्के मतदान झाले.

मतदानासाठी राज्यात एकूण 51,890 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 5 कोटी 26 लाख 90 हजार 146 मतदारांनी 1862 उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दावा केला आहे की, यावेळी राजस्थानमधील प्रथा बदलेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajasthan Election Voting
Rohit Pawar : आगामी निवडणुकींसाठी जातीत तेढ निर्माण करून राज्यात वातावरण तापवलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

मतदानादरम्यान एकूण 26,393 मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाकडून या मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यात आले होते. मतदानासाठी 65,277 बॅलेट युनिट, 62,372 कंट्रोल युनिट आणि 67,580 व्हीव्हीपीएटी मशिन्स (रिझर्व्हसह) वापरण्यात आल्या. त्याचवेळी विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी 6,287 'मायक्रो ऑब्झर्व्हर्स' आणि 6247 सेक्टर ऑफिसर्सची नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Marathi News)

वसुंधरा यांचा राहुल गांधींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. यावरून आता भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''मला वाटत नाही की कोणत्याही व्यक्तीने, विशेषत: जर तो राजकीय क्षेत्रात असेल, त्याने अशी भाषा वापरावी. आपले नेते काय करतात याकडे नवीन मतदारांचे लक्ष लागले आहे.''

Rajasthan Election Voting
Mahadev App : छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांना मोठा दिलासा; महादेव अॅप प्रकरणात असीम दासने फिरवली साक्ष

काँग्रेसचा विजय होणार, सचिन पायलट यांनी व्यक्त केला विश्वास

दरम्यान, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न झाल्यानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचा विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मलाआशा आहे की 3 डिसेंबरला काँग्रेसला बहुमत मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com