Rohit Pawar : आगामी निवडणुकींसाठी जातीत तेढ निर्माण करून राज्यात वातावरण तापवलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Jalna News : आगामी निवडणुकींसाठी जातीत तेढ निर्माण करून राज्यात वातावरण तापवलं जातंय, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Rohit Pawar In Jalna
Rohit Pawar In Jalna Saam Tv
Published On

Rohit Pawar News :

जाती-जातीत तेढ निर्माण करून जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात गरीबावर कारवाई झाल्याचं देखील ते म्हणाले. अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.

यावर रोहित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. सरकारकडून जेव्हा लाठीचार्ज केला जातो, तेव्हा तिथे असलेला युवा हा पक्ष पाहत नाही, तर माणुसकी पाहतो आणि माणुसकीच्या नात्याने जेव्हा मस्तकात आग जाते, तेव्हा त्यांना कुणीही थांबवू शकत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. जालन्यातील मंठ्यात आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar In Jalna
Soumya Vishwanathan Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात 15 वर्षांनंतर न्याय; चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

बीडमध्ये घरं जाळणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी का कारवाई केली नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष व्हावा, असं कुणाला वाटत असेल आणि या शक्तीचं पोलीस ऐकत असेल तर ती शक्ती सत्तेत आहे, असा आमचा समज असल्याचा आरोप त्यांनी केला. (Latest Marathi News)

31 डिसेंबर पर्यत राज्य सरकार पडेल असा, दावा देखील त्यांनी केला. याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची तयारी सुरू असल्याकचाही दावा त्यांनी केला.

Rohit Pawar In Jalna
Mahadev App : छत्तीसगडचे CM भूपेश बघेल यांना मोठा दिलासा; महादेव अॅप प्रकरणात असीम दासने फिरवली साक्ष

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असून येणाऱ्या अधिवेशनात एक अख्खा दिवस याबाबत चर्चा केली जाईल, सरकार जो सकारात्मक निर्णय घेईल त्याला आमचा पाठींबा असेल असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com