एक मोठी बातमी समोर आली आहे. टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने चार दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी लवकरच बाहेर येणार आहे, कारण न्यायालयाने त्याला केवळ 3 वर्षांची शिक्षा ठोठावली असून, आता त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने कारागृहात घालवलेला काळ लक्षात घेऊन त्याची सुटका होणार आहे.
तर मृत सौम्या यांच्या आईने 15 वर्षांनंतर या प्रकरणात न्याय मिळाल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाला की, मी न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत आहे, परंतु याचा मला आनंद नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
30 सप्टेंबर 2088 रोजी झाली होती हत्या
दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर 30 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी ही हत्या करण्यात आली होती. फिर्यादीनुसार, एका इंग्रजी टीव्ही चॅनलमध्ये काम करणारी सौम्या विश्वनाथन त्या रात्री ड्युटीवरून परतत असताना त्यांची कार लुटण्यासाठी काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिस तपासादरम्यान, रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी अशी ही घटना घडवून आणणाऱ्या आरोपींची ओळख पटली. (Latest Marathi News)
खटल्याच्या सुमारे एक महिना आधी, 18 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना आयपीसीच्या कलम 302 आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. याशिवाय या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे. अजय सेठी उर्फ चाचावर संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना जाणूनबुजून मदत केल्याचा आरोप आहे.
हत्येसाठी मारेकऱ्यांनी ज्या कारचा उपयोग केला ती अजय सेठी याची होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ही कार जप्त केली होती. न्यायालयाने त्याला गुन्ह्यास प्रोत्साहन देणे, जाणूनबुजून मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे, तसेच MCOCA तरतुदी आणि संघटित गुन्ह्याद्वारे पैसे कमविण्याचे षड्यंत्र रचणे यासाठी दोषी ठरवले आहे.
या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबाबत शुक्रवारी चर्चा पूर्ण झाली असता, न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. शनिवारी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना दुहेरी जन्मठेपेची तर अजय सेठी उर्फ चाचाला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. याशिवाय दोषींवर 1.25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.