Diamond Duck: क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हणजे काय? ज्यामुळे अर्शदीप अन् ऋतुराज झाले बाद

What Is Diamond Duck In Cricket: क्रिकेटमध्ये डायमंड डक ही काय भानगड आहे?ज्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंगला मैदान सोडावं लागलं आहे.
diamond duck
diamond ducksaam tv news
Published On

Diamond Duck In Cricket:

वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टनममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर २ गडी राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०९ धावांचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. दरम्यान या सामन्यात भारताचे २ फलंदाज डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतले. या सामन्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला असेल की डायमंड डक म्हणजे काय? जाणून घ्या.

डायमंड डक म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अर्शदीप सिंग ज्याप्रकारे बाद होऊन माघारी परतले. त्यालाच गोल्डन डक असं म्हटलं जातं. जेव्हा एखादा फलंदाज फलंदाजीसाठी येतो आणि एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्राईकला राहुन धावबाद होतो. (What Is Diamond Duck In Cricket)

अशा पद्धतीने बाद होण्याला डायमंड डक (Diamond Duck) असं म्हणतात. ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंग हे दोघेही अशाचप्रकारे बाद होऊन माघारी परतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होणारा ऋतुराज गायकवाड हा तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. तर अर्शदीप सिंग चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. (Latest sports updates)

diamond duck
Ind vs Aus 1st T20I: सूर्याने कॅप्टन बनताच रचला इतिहास! पहिल्याच सामन्यात मोडला रोहित,धोनी अन् विराटला न जमलेला रेकॉर्ड

टी -२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डायमंड डक म्हणून बाद होणारा जसप्रीत बुमराह हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. तर अमित मिश्रा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्रा डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतला होता. आता या यादीत अर्शदीप सिंग आणि ऋतुराज गायकवाड यांचं नाव जोडलं गेलं आहे.

diamond duck
IND vs AUS, Last Over: W,W,W अन् रिंकूचा मॅचविनिंग षटकार; शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस इंग्लिसने वादळी शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २०८ धावा केल्या.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०९ धावांची गरज होती. भारतीय संघाकडून सुर्यकुमारन यादवने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंगने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com